कोल्हापूर पोलीस प्रवाह न्युज चा रक्षाबंधन उपक्रम आनंद देणारा ; अजितकुमार जाधव (पो. निरीक्षक कागल)

 कोल्हापुर प्रतिनिधी ; विवेक पोतदार

अधिक माहिती संपर्क ; 9766498212

Police Pravah News Live

भारतीय संस्कृतीतील पवित्र मानला जाणारा रक्षाबंधन हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.कागल पोलीस ठाणे येथे पोलीस प्रवाह न्युज च्या वतीने आयोजित करण्यात आला होता त्याला अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला.

बहिण भावाच्या प्रेमाचा अतुट नात्याचा हा सण साजरा करताना पोलीस प्रशासन मात्र पोलीस ठाण्यात अखंड सेवा देत असतात.त्यांना ह्या सणांमध्ये सहभागी होता येत नाही.अश्या परिस्थिती मध्ये पोलीस प्रवाह न्युज चे संस्थापक नवनाथ कापले यांच्या संकल्पनेतुन पोलीस ठाण्यामध्ये जाऊन रक्षाबंधन साजरा करण्याचा उपक्रम हाती घेतला गेला.

हा उपक्रम खुप कौतुकास्पद असुन पोलीस प्रशासनाच्या दैनंदिन व्यापातून आणि सार्वजनिक ठिकाणचा बंदोबस्त ह्यामुळे सण व उत्सव साजरे करता येत नसतात.पण पोलीस प्रवाह न्युज ची टीम ठाण्यात येऊन केलेली राखी पौर्णिमा आनंद देणारी उत्साह वाढवणारी होती असे मनोगत कागल पोलीस ठाण्याचे (पी.आय) अजितकुमार जाधव यांनी केले.तर एन.सी.सी विभाग प्रमुख लेफ्ट. संतोष जेटीथोर यांनी देखील उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

ह्यावेळी उपनिरीक्षक दिपक वाकचौरे,मोनिका खडके,राम डावळे त्याचबरोबर डी.आर.माने महाविद्यालयाचे प्राध्यापक आबासाहेब चौगले,लेफ्ट. प्राध्यापक संतोष जेटीथोर,एन.सी.सी विभागाचे विद्यार्थी माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी पोलीस प्रवाह न्युज जिल्हा प्रमुख विवेक पोतदार,प्रतिनिधी विनायक सातुसे,कागल पोलीस ठाण्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या