कोल्हापूर - सोनार समाज्याचा विशेष पुरस्कार व विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न..

 सोनार समाज्याचा विशेष पुरस्कार व विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी = विवेक पोतदार.

   अखिल भारतीय सोनार समाज संघर्ष कृती समिती कोल्हापुर यांच्या वतीने  विशेष पुरस्कार व विद्यार्थी गुणगौरव समारंभ विठ्ठल मंदिर कार्यालय रेंदाळ येथे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी शशीकुमार गणेश पोतदार तर प्रमुख पाहुणे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी बाबुराव महामुनी  (डी.वाय.एस.पी) होते.

यावेळी सामाजिक कार्याची दखल घेत "समाजभुषन पुरस्कार" नारायण मारुतराव पोतदार कोल्हापुर तर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले यशस्वी उद्योजक "उद्योगरत्न पुरस्कार" राजेंद्र पोतदार खडकलाट तर विवाह विषयक समस्यांवर कार्य करणाऱ्या बाळकृष्ण बहुलेकर चाफळ यांना "कृतज्ञता पुरस्कार" तर विविध संस्था संघटने मध्ये निवड झालेल्या समाज बांधवांचे सत्कार व गुणवंत गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

'विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा जागृत करणं हा शिक्षणाचा मूळ हेतू होय.आईवडील आणि गुरुजनांचा आदर करणं ही काळाची गरज आहे.संस्कार चुकला की संस्कृती बिघडते.पालकांनी मुलांचा कल ओळखून प्रेरणा द्यायला हवी.काळाबरोबर धावताना स्वतःचे अस्तित्व निर्माण करा.ग्रंथ वाचनाबरोबर माणसं वाचा,समाज कळतो.' असे प्रतिपादन प्रा. डॉ.चंद्रकांत पोतदार यांनी काढले.


तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाबुराव महामुनी समाज्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी असे उपक्रम राबविले पाहीजेत त्यातुन प्रेरणा मिळते.असे मनोगत व्यक्त केले

     यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पोतदार कुरुंदवाडकर यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला.

   स्वागत अजित पोतदार रेंदाळ यांनी, तर आभार प्रदर्शन सचिव निलेश पोतदार रेंदाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक पोतदार व गौरव पोतदार यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संचालक,पदाधिकारी आणि समाज बांधवांनी सहभाग घेतला.मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या