साके ते बाळु मामा पायी दिंडी उत्साहात संपन्न

 

पोलीस प्रवाह न्युज ;कोल्हापुर

जिल्हा प्रतिनिधी ; विवेक पोतदार

साके ता.कागल येथील हरिपाठ भजनी मंडळ साके आणि साके गावातील बाळु मामा भक्त यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रावण महिन्यातील पहिला रविवार सकाळी ८ वाजता साके ते श्री क्षेत्र अदमापुर बाळु मामा पायी दिंडी सोहळा संपन्न झाला.

                     श्रावण महिन्यातील पहिला रविवार त्यामुळे मोठ्या संख्येने बाळु मामा भक्त ह्या दिंडी मध्ये सहभागी झाले होते.एकूण २१७ भाविक होते तर महिलांचा सहभाग अधिक प्रमाणात होता. मनात विठ्ठल आणि बाळु मामाच्या भेटीची आस धरून हातात टाळ आणि मुखात राम कृष्ण हरी,ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करत सकाळी विठ्ठल मंदिरातून आरती करुन दिंडीला सुरवात झाली.बाळु मामांची आई देखील विठ्ठल भक्त होती स्वतः बाळु मामांची विठ्ठलावरl श्रद्धा असलेने वारकरी संप्रदाय मोठ्या उत्साहात दिंडी मध्ये रमला होता.

                    तर जेष्ठ महिलांनी बाळु मामांची बोली गाणी आणि ओव्या गात बाळु मामाच्या नावानं चांगभलं करत ऊन वारा पाऊस याचा विचार न करता हा पायी दिंडी सोहळा आनंदात पुर्ण केला.तर दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी शहाजी पाटील,राजाराम पाटील (के.डी.सी.सी),राजु सातुसे,अशोक ससे,विश्वास पाटील,विनायक सातुसे यांनी अधिक मेहनत घेतली.

तर हरिपाठ भजनी मंडळाचे बाळु तु.पाटील,संतोष गवसे,साताप्पा आगलावे,संदिप खराडे,निऊंगरे,बाळु पोवार,सुधाकर पोवार यांनी अभंग आणि भजन तर समाधान कोराने मृदंग सेवा केली.पायी दिंडीमध्ये ग्रामस्थ वारकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या