सिद्धगिरी हॉस्पिटलच्या मध्ये आता आर्थोस्कोपी आणि आर्थोप्लास्टी झाली आणखी प्रगत -डॉ.तनिष पाटील यांना आर्थोप्लास्टी ची फेलोशिप

सिद्धगिरी हॉस्पिटलच्या मध्ये आता आर्थोस्कोपी आणि आर्थोप्लास्टी झाली आणखी प्रगत



          *सिद्धगिरी हॉस्पिटलच्या आर्थोपेडिक डिपार्टमेंटचे डॉक्टर तनिष पाटील यांनी नुकतीच पुणे येथून आर्थोप्लास्टी ची फेलोशिप प्राप्त केली.*  डॉ. तनिष पाटील हे *MBBS, M.S. Surgen* असून त्यांनी २०१९ मध्ये हिंदुजा हॉस्पिटल मुंबई येथून *आर्थोस्कोपी फेलोशीप* घेतली आहे. यामुळे आता सिद्धगिरी हॉस्पिटलची रुग्णसेवा आणखी प्रगत होणार आहे.

           स्नायू म्हणजे लिगामेंटस हे आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाचे काम करत असतात. वेगवेगळे मैदानी खेळ जसे की क्रिकेट,फुटबॉल की ज्यामुळे गुडघ्याच्या तसेच खांद्याच्या दुखापती होऊ शकतात. तर कधी कधी अगदी टू व्हीलर चालवताना देखील वेदनेचा सामना आपल्याला करावा लागतो. पण या वेदनांचे मूळ अंतर्गत दुखापती असू शकतात हे आपल्या लक्षात येत नाही. आणि आपण याकडे किरकोळ गोष्ट म्हणून दुर्लक्ष करतो. आणि हीच गोष्ठ पुढे जाऊन गंभीर रूप धारण करते. या दुखापतींची तीव्रता आणि स्वरूप लक्षात येत नसल्यामुळे बरेच जण पेनकिलर खावून अंगावर काढत राहतात.  जसे की गुडघ्याची मिनिस्कस सर्जरी म्हणजे साध्या सरळ मराठी भाषेत बोलायचं झाल्यास गुडघ्याच्या हाडांच्या मधील गादीची किंवा कूर्चाची सर्जरी. की ज्यामध्ये अर्थोस्कोपी हा पर्याय आहे उपयुक्त ठरतो.   

          आर्थ्रोस्कोपी ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याचा उपयोग डॉक्टर सांध्यातील समस्याचे निदान करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी करतात. त्याचप्रमाणे अर्थोप्लास्टी ही एक छोटीशी शस्त्रक्रिया आहे की जी बाह्यरुग्ण आधारावर केली जाते, याचा अर्थ तुम्ही त्याच दिवशी घरी जाऊ शकता.  तुम्हाला एखाद्या सांध्यामध्ये वेदना होत असल्यास, सांध्याना दुखापत झाल्यास किंवा सांधे खराब झाल्यास तुमचे डॉक्टर आर्थ्रोस्कोपीचा पर्याय निवडतात. आर्थ्रोस्कोपी शस्त्रक्रिया जास्त करून  गुडघा, खांदा, कोपरा, घोटा, मनगटावर केली जाते.

आर्थ्रोस्कोपीच्या प्रक्रियेदरम्यान, तुमचे डॉकटर तुमच्या सांध्यामध्ये छोटे होल करून दुर्बिणीच्या सहाय्याने सांध्याचे किती नुकसान झाले आहे हे पाहतात. तसेच अर्थोप्लास्टी च्या सहाय्याने अनेक दुखापती देखील बऱ्या करतात. 

          आर्थ्रोस्कोपीचे वैशिष्ट्ये सांगायचे झाले तर दुर्बिणीद्वारे अत्यंत लहान छिद्रामधून शस्त्रक्रिया केल्या जात असल्यामुळे कमी प्रमाणात रक्तस्त्राव होतो. यामुळे हॉस्पिटलाईज होण्याचे प्रमाण कमी होऊन फास्ट रिकवरी होते. *सिद्धगिरी हॉस्पिटलच्या सिटी स्कॅन, अत्याधुनिक नव्याने दाखल झालेले सिमेन्स सेंप्रा १.५ टेस्ला हे एम आर आय मशीन, मॉड्युलर ओपरेशन थिएटर, कुशल अनेस्थेसिस्ट, प्रशिक्षित स्टाफ* या वैशिष्ट्यांसोबत आता *डॉक्टर तनिष पाटील यांच्या प्रगत आर्थ्रोस्कोपी तंत्रामुळे कोल्हापूर तसेच पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांची आरोग्यसेवा देता येणार आहे.* याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन *सिद्धगिरी हॉस्पीटलचे मेडिकल डायरेक्टर व प्रख्यात निरो सर्जन डॉक्टर शिवशंकर मरजकके, मेडिकल सुप्रीटेंडन्ट डॉ.प्रकाश भरमगौडर* यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या