देवकुंड येथे एका तरुणाचा बुडून मृत्यू.

 देवकुंड येथे एका तरुणाचा बुडून मृत्यू.

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव : दि. ३ - माणगांव तालुक्यात भिरा येथे देवकुंड धबधबा आहे. दरवर्षी पावसाळ्यात अनेक पर्यटक धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. धबधबा मनमोहक असला तरी तेथे जाण्यासाठी ७ किमी चालत जावे लागते. एक नाला आलोंडून जावा लागतो. अचानक पाणी वाढून तसेच बुडून अनेक जण दगवल्याच्या घटना ही येथे घडल्या आहेत. अशीच एक घटना रविवार दि. ३ जुलै रोजी घडली असून कुंडलिका नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू झाला आहे.

    मुंबईहुन १७ जण मोटारसायकलने देवकुंड धबधबा येथे फिरायला आले होते. त्यातील दिनेश तुकाराम शिंदे, वय २४ वर्ष, व्यवसाय नोकरी रा. पिंपरीगाव, दहिसर मोरी,  ठाणे हा ठाणे येथुन मित्रासह मौजे म्हसेवाडी गाव येथील कुंडलिका नदी पात्रात पोहण्यासाठी गेला असता नदीचे पात्रात दुपारी ०२.३० वा सुमारास बुडून मयत झाला आहे. मृतदेह उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे आणण्यात आला आहे. दरवर्षी येथे पर्यटकांचा बुडून मृत्यू होत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दरवर्षी जिल्हाधिकारी देवकुंड आवारात १४४ कलम लागू करतात.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या