लायन्स क्लब या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या डिस्ट्रिक्ट 3234D2 च्या रिजन चेअरमन या पदाकरिता सन 2022-23 या वर्षाकरता लायन अनिल झोपे यांची निवड करण्यात आली आहे.
लायन अनिल झोपे यांची लायन्स करिअर ची सुरुवात सन २००१-०२ वर्षापासून झाली, ते सन २०१०-११ या वर्षी *लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरी* चे अध्यक्ष होते.
त्यांना बेस्ट प्रेसिडेंट ऑफ ठे डिस्ट्रिक्ट चा किताब मिळाला होता.
त्यांच्या काळात त्यांनी मावळ भागातील *कान्हेवाडी* हे गाव दत्तक घेऊन लायन्स क्लब च्या माध्यमातून त्या गावाचा विकास, गावातील शाळेचा विकास, गावातील महिलांचा विकास करून या गावास नावलौकिक मिळवून दिला आहे.
त्याच बरोबर डिस्ट्रिक्ट 3234D2 च्या *जॉइंट कॅबिनेट सेक्रेटरी* या पदावर त्यांनी 2012 -13 या वर्षात उत्कृष्ट काम केले होते.
करोना मधील Pandemic situation मध्ये त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सोसायटी साठी अहोरात्र मदत केली, त्यासाठी त्यांना विविध सामाजिक संस्थांकडून "कोविड योद्धा' पुरस्काराने गौरवण्यात आले.
ते स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांचा भागीदारी मध्ये व्यवसाय, एन बी टेक्नॉलॉजीस या नावाने चिंचवड एमआयडीसी मध्ये आहे.
त्यांना पहिल्यापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे. लायन्स क्लब प्रमाणेच औद्योगिक, सामाजिक व संगीत या क्षेत्रात त्यांचे खूप नाव लौकिक आहे.
२०२२-२३ या वर्षाकरीता निवड झालेले डिस्ट्रिक्ट 3234D2 चे प्रांतपाल लायन राजेश जी कोठावदे यांनी त्यांची सेवाभावी वृत्ती बघूनच त्यांची रीजन चेअरमनपदी विश्वासाने निवड केली आहे.
येणाऱ्या काळात लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरी चे नाव नक्कीच अजून उंचीवर नेणार असा विश्वास लायन अनिल झोपे यांनी व्यक्त केला आहे.
त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, असेच सत्कार्य त्यांच्या हातून घडावे ही अपेक्षा.


0 टिप्पण्या