शालेय विद्यार्थ्यांसाठी नियमित एस टी बस सुरु करा. - कागल आगार प्रभारी व्यवस्थापक श्री. सणगर यांना संभाजी ब्रिगेडच्यावतीने निवेदन ..
प्रतिनिधी -विवेक पोतदार.
उन्हाळी सुट्टी नंतर शाळा महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू झालेले आहेत.ग्रामीण भागातून शहराकडे शाळेला व महाविद्यालयाला येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
*यामध्ये गोरंबे,केनवडे ,साके,व्हनाळी बाचणी,सिद्धनेर्ली,बामणी,एकोंडी शेंडूर,शंकरवाडी,वंदुर,करनुर सुळकुड, सांगाव, लिंगनुर दुमाला* यासह इतर गावांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना खाजगी वाहतूक,लिफ्ट मागून किंवा मिळेल त्या वाहनाने धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागत आहे.विशेषतः मुलींना हे धोकादायक आहे.
कागल आगाराकडून सध्या एसटीच्या फेऱ्या अगदी कमी प्रमाणात आहेत त्यामुळे एखादे वेळेस एसटी बस किंवा इतर वाहन नाही मिळाले तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेमध्ये एसटीच्या फेऱ्या कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढवाव्यात ही विनंती कागला आगारास केली आहे. याबाबत जर कार्यवाही नाही केली तर 7 जुलै रोजी विद्यार्थी व पालक यांच्यासह कागल आगारावर मोर्चा काढला जाईल अशा आशयाचे निवेदन दिले..
*यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नेताजी बुवा, मा.जिल्हा कार्याध्यक्ष नितीन काळबर,मा.कागल तालुका अध्यक्ष सुनील जाधव, कागल शहर कार्याध्यक्ष अरुण जकाते,संताजी घोरपडे मधुकर मोरबाळे,अतुल खद्रे यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते..*


0 टिप्पण्या