सोनार समाजामध्ये अनिष्ट विधवा प्रथा बंद' - अखिल भारतीय सुवर्णकार समाज कृती समितीचे कृतिशील पाऊल.
कागल प्रतिनिधी - ओंकार पोतदार.
समाजातील अनिष्ठ अशा विधवा प्रथेच्या निर्मुलनासाठी सध्या सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतीनी ठराव सुरवात केली आहे.आता हाच निर्णय विविध समाजा मार्फत घेण्यात येत आहे.
अखिल भारतीय सुवर्णकार समाज संघर्ष कृती समिती कोल्हापूरची त्रेमासिक मीटिंग कुंभोज येथे दिनांक- 28-06-2022 रोजी संपन्न झाली यावेळी विधवा प्रथा, पतीच्या निधनावेळी कपाळाचे कुंकू पुसणे, हातातील बांगडया फोडणे, मंगळसूत्र काढणे, पायातील जोडवे काढणे आदी कुप्रथा आहेत.
पतीच्या निधनानंतर विधवा म्हणून समाजात वावरताना महिलांना अवहेलना सहन करावी लागते. या महिलांना धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही. यामुळे व्यक्तीच्या जीवन जगण्याच्या मानवाधिकारांचे व भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समता व न्यायाच्या हक्काचे उल्लंघन होते. या कुप्रथांचे निर्मुलन करण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती आवश्यक आहे. एकविसाव्या शतकात विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून आपण वाटचाल करत असताना विधवा प्रथा प्रचलित असणे विरोधाभासी आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या प्रथेविरूद्ध ग्रामसभेत ठराव घेऊन प्रथा बंद केली त्याप्रमाणे सोनार समाजातही ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी सर्व सोनार समाज बांधवांना आव्हान करण्यात आले की इथून पुढे समाजातील कोणत्याही विधवा स्त्री सोबत भेदभाव करू नये त्यांना सर्व सामाजिक कार्यात सहभागी करून घ्यावे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच गावांमध्ये अनिष्ट विधवा प्रता बंदीचा निर्णय घेतला आहे.
त्याचा आदर्श घेऊन सोनार समाजाने अनिष्ट विधवा प्रता बंद च्या दिशेने उचलेले पाऊल सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.
यावेळी अखिल भारतीय सुवर्णकार समाज संघर्ष कृती समितीचे सर्व पदाधिकारी आणि सोनार समाजातील मान्यवर,समाज बांधव उपस्थित होते.




0 टिप्पण्या