माणगाव तालुक्यातील पाणसई येथे गावठी बॉम्ब व साहित्या सह दोन आरोपीना अटक.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव- दि.२० - माणगांव पोलीस ठाणे हद्दीत गावठी बॉम्ब व गावठी बॉम्ब तयार करण्याच्या साहित्यासह दोन आरोपींना माणगांव पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की, दि. १९ जून रोजी रात्री ११ वा. दरम्यान पोशि/ तांदळे यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे पाणसई आदीवासी वाडी ता. माणगांव येथील राहणारा बाबु दगडु जाधव व राम यशवंत वाघमारे वय ४५ रा. विळा आ.वाडी ता. माणगांव हे रानडुकराची शिकार करण्याकरीता वापरण्यात येणारे गावठी बॉम्ब तयार करतात. अशी माहिती गृप्त बातमी दारा मार्फत प्राप्त झाल्याने पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रविण पाटील यांचेमार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस ठाण्याचे पोनि राजेंद्र पाटील, पोसई गायकवाड, पोसई अघाव, सहा. पोलीस उप निरीक्षक जे. टी. वाटवे, सहा. पोलीस उप निरीक्षक भोजकर, पोह कुवेस्कर, पोशि प्रविण माटे, पोशि मयुर पाटील, पोशि विनय पाटील, पोशि रामनाथ डोईफोडे, पोशि भरत तांदळे, पोशि नाथा दहीफळे, यांनी छापा टाकला असता बाबु दगडु जाधव रा.पाणसई ता. माणगांव यांचे ताब्यात एका प्लॅस्टीकच्या बरणीत ठेवलेले लहान सुपारीचे आकाराचे गावठी बॉम्ब एकुण ८ नग, एका प्लॅस्टीकची पिशवी त्यात सुमारे २ किलो वजनाचे पिवळ्या रंगाचे काडया व लाल रंगाची पावढर स्फोटक पदार्थ तयार करण्या करता वापरण्यात येत असलेले १०० ग्रॅम वजनाचे प्लॉस्टीकचे पिशवीतील मिळुन आले. सदरचे बॉम्ब हे खरे आहेत अगर कसे? या बाबत बॉम्ब स्फोटक पथक अलिबाग-रायगड यांना पाचारण करुन मिळुन आलेल्या बॉम्बची व साहीत्याचे श्वान ब्रुनो याचे कडुन तपासणी करुन खात्री करण्यात आली आहे. मिळुन आलेल्या आरोपीत बाबु दगडु जाधव वय ५० यांचे कडे गुन्हयाचे तपास कामी चौकशी करता आपल्यास गावठी बॉम्ब तयार करणे करीता माझा साडु राम यशवंत वाघमारे वय ४५ रा. विळा हा मदत करतो.
तसेच चासलाल पुर्ण नांव माहिती नाही रा. मध्यप्रदेश हा गावठी बॉम्ब तयार करणे करीता लागणारे सामुग्री पुरवीत असतो तसेच स्वतः ही तयार करुन विकत असतो असे सांगीतले असुन त्यांचे विरुध्द माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर १७७/२०२२ भादविक २८६, ३४, सामाजिक सह स्फोटक अधिनियम सन १९०८ चे कलम ३, ४, ५, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा तपास सपोनि एन. डी.लहांगे हे करीत आहेत. बाबु दगडु जाधव वय ५० रा. पाणसई आ. वाडी ता. माणगांव जि. रायगड राम यशवंत वाघमारे वय - ४५ रा. विळा आ.वाडी ता. माणगांव यांना अटक करण्यात आली आहे. चासलालपुर्ण नांव माहिती नाही. रा. मध्यप्रदेश यांचा शोध घेवुन त्याचे अटकेची कार्यवाही करणे कामी माणगांव पोलीस ठाण्याकडील पथक नेमण्यात आले आहे.



0 टिप्पण्या