रसिकलाल एम धारीवाल च्या ३२ विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये निवड

 

रसिकलाल एम धारीवाल च्या ३२ विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये निवड

श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलीत , रसिकलाल एम धारीवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी , चिंचवड मधील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल च्या बतीने घेण्यात आलेल्या मुलाखतीत पॉलिटेक्निक च्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील अंतीम वर्षातील ३२ विद्यार्थ्याची निवड करण्यात आली . मुलाखतीसाठी बजाज ऑटो लिमिटेड - आकुर्डी , मदरसन इंडीया - चाकण , स्पार्क मिंडा - चाकण , यझाकी इंडीया , अॅथेरोन एरोस्पेस इत्यादी कंपनींच्या प्रतिनिधींनी कॉलेजमध्ये येऊन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांची निवड केली . निवड झालेल्या विद्यार्थ्याचे अभिनंदन संस्थेचे ऑनररी जनरल सेकेटरी श्रीमान अॅड राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा संस्थेचे कार्यकारी अधिकारी मा . श्री . खिलारी सर पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा . अनिल थिटे विभागप्रमुख प्रा . अपूर्वा देशपांडे , प्रा . संदीप सुरवसे व प्रा . गणेश कोकाटे आणि प्लेसमेंट सेलचे आयोजन प्रा . मुख्तार मोमीन तसेच प्रा . श्रीराम खडके , प्रा . आशिष जैन व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल च्या समितीने केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या