विश्वकर्मा सुवर्णकार सहकारी पत संस्था कोल्हापूर,पंचवार्षिक निवडणूक - तिरुपती बालाजी पॅनल विजयी..
प्रतिनिधी
विवेक पोतदार.
कोल्हापूर ता. २७- कोल्हापूर येथील विश्वकर्मा सुवर्णकार सहकारी पत संस्था, कोल्हापूर ही गुजरी परिसरातील सुवर्णकार दैवज्ञ बांधवांची पत संस्थेची पंचवार्षिक निवडणूक काल २६ जून २०२२ रोजी पार पडली सकाळी मतदान होऊन रात्री मत मोजणी झाली.
या निवडणुकीत *तिरुपती बालाजी पॅनल* आणि *श्री दैवज्ञ विश्वकर्मा सत्तारूढ पॅनल* अशी दुरंगी लढत झाली असून तिरुपती बालाजी पॅनेलचे सर्वसाधारण मतदारसंघात ५ उमेदवार, महिला प्रतिनिधी मध्ये २ आणि इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मध्ये १ असे ११ उमेदवार भरगोस मतांनी निवडून आले तर दैवज्ञ विश्वकर्मा सत्तारूढ पॅनलचे ३ उमेदवार विजयी झाले.
विजयी झालेल्या तिरुपती बालाजी पॅनल मध्ये *सर्वसाधारण* *मतदारसंघ*
1) सतीश शिर्वटकर :- 1337
2) संजय चोडनकर :- 1328
3) रघुनाथ मसुरकर :- 1325
4) अवधूत मालवणकर :- 1203
5) संजय कारेकर :- 1181
6) उदय नागवेकर :- 1170
7) विजय घारे :- 1149
8) समीर नार्वेकर :- 1133
*महिला प्रतिनिधी*
1) गीतांजली पेडणेकर :- 1344
2) पूनम शिरवडेकर :- 1234
*इतर मागासवर्गीय प्रतिनिधी*
1) एकनाथ चोडणकर :- 1350
असे तर, दैवज्ञ विश्वकर्मा सत्तारूढ पॅनल मध्ये १) विजय घारे, २) समीर नार्वेकर आणि ३) संजय कारेकर असे उमेदवार निवडून आले.
तिरुपती बालाजी पॅनेलचे शिवनाथ पावसकर यांचे अल्प मतात विजय हुकला त्यांना या निवडणूकीत ११२३ मतांवर समाधान मानावे लागले..
काल रात्री सुमारे ८:३० वाजता निकालाचे सत्र पूर्ण झाल्यावर सर्व विजयी उमेदवार यांनी एकत्र येऊन गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
यावेळी मोटर सायकल रॅली काढण्यात आली, दोन दिवसात पत संस्थेचा कार्यभार हातात घेतला जाईल असे सौ. गीतांजली पेडणेकर, सतीश शिरवटकर यांनी सांगितले
---------------------------------------------



0 टिप्पण्या