ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहोळा संपन्न.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव : दि. १९ - माणगांव तालुक्यातील मोर्बा मतदार संघात राज्यमंत्री तथा रायगड पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते शनिवार दि. १८ जून रोजी रु. २ कोटींच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला.
यामध्ये स. ११.१५ वा. जावळी अंगणवाडी इमारत उदघाटन, गट ग्रा. पं. लोणशी नवीन कार्यालय लोकार्पण, ग्रा. पं. कुमशेत कार्यालय भूमिपूजन, शिरवली तर्फे गोवेले जोडरस्ता भूमिपूजन, ढाकशेळी अंतर्गत रस्ता भूमिपूजन, दहिवली तर्फे गोवेले रस्ता उदघाटन, देगाव जोड रस्ता उदघाटन, महादपोली आदिवासी वाडी अंगणवाडी इमारत उदघाटन, मोर्बा डोंगरोली महादपोली बौद्धवाडी रस्ता भूमिपूजन, मोर्बा देगाव रस्ता भूमिपूजन, मोर्बा अंतर्गत रस्ता उदघाटन, मोर्बा कब्रस्थान शेड भूमिपूजन, मोर्बा येथे साकव उदघाटन, मोर्बा दरगाह विहिरीकडे जाणार रस्ता भूमिपूजन, सुर्ले आदिवासीवाडी अंगणवाडी इमारत उदघाटन या कामांचा समावेश होता.
मोर्बा मॉडर्न स्कुल येथे घेण्यात आलेल्या जाहीर सभेच्या वेळी ना. आदिती तटकरे म्हणाल्या की, मोर्बा मतदार संघाचे तसेच माणगांव तालुक्याचे तटकरे कुटुंबावर नेहमी प्रेम राहिले आहे. खासदारकीच्या निवडणुकीवेळी मोर्बा मतदार संघातून खा. तटकरेंना एक टाकी मतदान झाले. मोर्बा तलाव सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मॉडर्न इंग्लिश स्कुलसाठी आमदार निधीतून लॅब साहित्य ही येत्या काळात देण्यात येणार आहे. लोणशी ग्राम पंचायत कार्यालय इमारत अतिशय देखणी असून पुढील काळात होणाऱ्या ग्राम पंचायत इमारती पण अशाच उभ्या करण्यात याव्यात. लोणशी ग्राम पंचायत पुढच्या वर्षी ५० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने आरोग्य केंद्राला लागणार निधी ही लवकरात लवकर उपलब्ध करून काम ही सुरू करण्यात येईल.
मोर्बा मॉडर्न स्कुल इयत्ता दहावी मध्ये उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना.
या कार्यक्रमाला मा. ता. रा. कॉ. अध्यक्ष सुभाष केकाणे, ता. स. स. अध्यक्ष इकबाल धनसे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष शेखर देशमुख, महाराष्ट्र राज्य सचिव दिपक जाधव, महिला अध्यक्षा संगीता बक्कम, मा. पं. स. स. अलका केकाणे, मोर्बा अध्यक्ष अब्दुल्ला गंग्रेकर, उणेगाव सरपंच राजेंद्र शिर्के, इंदापूर अध्यक्ष काका नवगणे, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष बालाभाई सनगे, लोणेरे अध्यक्ष मुकुंद जांबरे, श्रध्दा यादव, इकबाल हर्णेकर, भोरावकर गुरुजी, गटविकास अधिकारी प्रभे, नायब तहसीलदार भाबड, शादाब गयबी, राजू मोरे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







0 टिप्पण्या