अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले युवतीचे जटा निर्मूलन...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथील युवतीचे केले जटा निर्मूलन.
राजेंद्र नगर, कोल्हापूर येथे आपल्या वृद्ध वडिलांसोबत राहणाऱ्या 34 वर्षीय युवतीच्या केसांत गेल्या काही वर्षांपासून जटा वाढलेल्या होत्या. वाढलेल्या जटांमुळे या युवतीच्या आरोग्यावरही परिणाम होत होता. याविषयी सदर युवतीच्या वडीलांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्या मुलीचे जटा निर्मूलन करण्याचे आवाहन केले. त्यानुसार कृष्णात स्वाती आणि कोल्हापूर शहर कार्याध्यक्ष स्वाती कृष्णात यांनी सदर युतीच्या घरी जाऊन तिचे प्रबोधन केले आणि अनेक वर्षांपासून केसात वाढलेल्या जटांचे ओझे काढून टाकले. या जटा काढल्यावर संबंधित युवती आणि तिच्या वडीलांनी आनंद व्यक्त केला आणि अंधश्रद्धा निर्मूलन करत असलेल्या कामाबद्दल सदिच्छा दिल्या.


0 टिप्पण्या