पोलीस प्रवाह न्यूज
रुग्णांची कोणत्याही प्रकारे हेळसांड होणार नाही याची जबाबदारी डॉक्टरांचीच-जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर.
माणगांव : दि. ९ - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दि. ९ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे नगर पंचायत माणगांव व उपजिल्हा रुग्णालय माणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र राज्य उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून यावेळी रायगड जिल्हा जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, शिवसेना नेते अँड. राजीव साबळे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, डॉ. संतोष कामेरकर, प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार प्रियांका आयरे, नाना सावंत, कॅन्सर पेंशट एड असोसिएशनच्या कार्यकारी संचालक नीता मोरे, नगर पंचायत मुख्याधिकारी राहुल इंगळे, शिवसेना द. रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, मा. जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, शिवसेना तालुका प्रमुख गजानन अधिकारी, मा. सभापती सुजित शिंदे, वैद्यकीय अधीक्षक प्रदिप इंगोले, उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ना. सुभाष देसाई म्हणाले की, माणगांव नगर पंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करीत आहोत. येत्या काही काळातच माणगांवची नवीन पाणी योजना मार्गी लागणार असून माणगांवची अनेक विकासकामे मार्गी लागणार आहेत. कोरोना काळात महिला डॉक्टर व परिचारिका यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. ठाकरे कुटुंबिय महिला सक्षमीकरणावर भर देत आहे. येत्या पुढील काळात उपजिल्हा रुग्णलाय पूर्णपणे अद्यावत करण्यात येईल. एम. आय. डी. सी.च्या अधिकाऱ्यामार्फत उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यात आली असून पुढील काळात परवानगीने उपजिल्हा रुग्णालय एम. आय. डी. सी. दत्तक घेण्यात इच्छुक असून त्यांच्या मार्फत अनेक सुख सुविधा येथे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आम्ही करू. नगर पंचायतीला माणगांवच्या विकासासाठी लागणारे सर्वोत्तरी सहकार्य माझ्याकडून राहील. एम. आय. डी. सी. मुख्याधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनी केली उपजिल्हा रुग्णालय माणगांवची पाहणी केली. अनेक विषयांवर डॉ. पी. अनबलगन यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार म्हणाले की, माणगांव नगर पंचायत व उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे अद्यावत उपकरणासोबत मनुष्यबळ ही उपलब्ध करून देण्यात यावा. माणगांव जनतेचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असून १००% समाजकारण करण्यावर आम्ही भर देत आहोत. जनतेच्या घरी जाऊन आम्ही त्यांच्या समस्या जाणून घेत असून लवकरात लवकर त्या मार्गी लागण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महाड येथे काही वर्षांपूर्वी ट्रॉमा केअर उभारण्यात आले आहे. परंतु, मनुष्यबळा अभावी त्याची परिस्थिती बिकट झालेली दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर म्हणाले की, रुग्णांची कोणत्याही प्रकारे हेळसांड होणार नाही याची काळजी व जबाबदारी डॉक्टरांची आहे. महिलांचा एक दिवस नसून पूर्ण ३६५ दिवस हे महिलांचे आहेत. लोकशाहीत सुद्धा महिलांचा प्रभाव आहे. जिल्हाधिकारी कार्यालय फक्त महसूल काम करत नसून सर्वांगीण विकासाची कामे सुद्धा करीत आहे.
या वेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अँड राजीव साबळे यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले कोरोना काळात जी मेहनत आरोग्य विभागाने घेतली त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यास मोठी मदत झाली. त्यासाठी भविष्यात आरोग्य विभागातील मनुष्यबळाची करतांना भरून काढली पाहिजे.

0 टिप्पण्या