मुरगूडचे स्थान माझ्या हृदयात.नामदार मुश्रीफ
मी तुमचा हमाल , सत्तेसाठी नाही जन सेवेसाठी कार्यरत..
कागल प्रतिनिधी ओंकार पोतदार
माझ्या आमदार व नामदार कीच्या काळात मुरगुड शहराच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. तुमच्या समस्या या माझ्याआहेत. मी आहे तसाच राहिलो आहे. माझ्या मध्ये कोणताही बदल झालेला नाही.मी कधी ही सुटाबुठात वावरत नाही मी तुमचा हमाल आहे. सत्तेसाठी नाही तर लोकांच्या सेवेसाठी मी काम करत आहे. अंबाबाई मंदिर पूर्ण व्हावे यासाठी निधी दिला आहे. अंबाबाईने जनसेवा करण्याचा आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करीत मुरगुड माझ्या हृदयात असल्याचे प्रतिपादन नामदार हसन मुश्रीफ यांनी केले
ते मुरगूड येथे बांधकाम कामगारांचा मेळावा, सुरक्षा संच, शिष्यवृत्ती वाटप प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते.
प्रवीणसिंह पाटील म्हणाले नामदार मुश्रीफ यांनी दहा वर्षाच्या काळात मुरगुड साठी तब्बल 80 कोटीचा निधी दिला. अंबाबाईच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी दोन कोटीचा निधी दिल्यानेच हे मंदिर पूर्णत्वास गेले आहे. याचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार व नाम. एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत व्हावा यासाठी प्रयत्न करावेत. आगामी मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट करुन सत्तारूढ गटाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.
नाम. मुश्रीफ यांची यांची जिल्हा बँकेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल व भैया माने, जयदीप पोवार यांच्या निवडीबद्दल प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रणजीत मगदूम, संजय मोरबाळे, दिग्विजय चव्हाण प्रथमेश कोळी ,पृथ्वीराज बाबर, दिगंबर परीट ,गणपती बारड, तानाजी भारमल, पी.एस.दरेकर यांचाही निवडीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.
यावेळी बिद्री चे अध्यक्ष के. पी .पाटील, प्रवीणसिंह भोसले, मनोज फराकटे, जगदीश पाटील, डी. डी. चौगले नगरसेवक राहुल वंडकर,रणजीत सुर्यवंशी, मनाजी सासणे, एम. बी. मेंडके, शिवाजी सातवेकर, राजेंद्र आमते, नामदेव भांदीगरे, अमर देवळे, जगन्नाथ पुजारी, अशोक पाटील,सत्यजित पाटील , राजेंद्र चव्हाण मान्यवर उपस्थित होते. स्वागत दिग्विजय पाटील, व प्रास्ताविक सुधीर सावर्डेकर यानी तर आभार महंतेश पाटील यांनी मानले.

0 टिप्पण्या