माणगांव मध्ये होळी, धूलिवंदन सणांच्या अनुषंगाने माणगांव पोलीसांचे पथसंचालन

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगाव : दि. १७ - रायगड जिल्ह्यात तसेच संपूर्ण तळ कोकणात मोठ्या उत्साहाने होळी सण साजरा केला जातो. या अनुषंगाने माणगाव पोलिसांनी होळी धुलीवंदन व छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथी प्रमाणे या उत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी माणगांव पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे. माणगाव शहरात रूट मार्च घेण्यात आला. तसेच माणगाव बस स्टँड येथे दंगा काबू योजना घेण्यात आली माणगांव पोलीस ठाणे हद्दीत माणगांव पोलीसानी आगामी सणाच्या अनुषंगाने माणगाव पोलीस ठाणे हद्दीत पथसंचलन दि १७ मार्च रोजी करण्यात आले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण पाटील व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग, महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटिल यांच्या सह  १० पोलीस अंमलदार, ८ होमगार्ड व आरसीपी प्लाटून माणगाव येथे हजर होते. यांनी पंथसंचलनात सहभाग घेतला.  

सुयोग्य पोलीस बंदोबस्त कायदा व सुव्यवस्थच्या अधीन राहून शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये,व लोकांमध्ये जनजागृती व्हावी ह्या अनुषंगाने माणगांव पोलीस ठाणे ते संपूर्ण माणगांव बाजारपेठत थसंचलन घेण्यात आले. या वेळी उपस्थीत नागरिक उत्सुकतेने पोलीसांचे पथसंचलन पाहत होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या