बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण पूर्वजांनी केलेली आहे ती की चुकीची नाही. कारण काही अशा व्यक्ती असतात की त्यांनी ही पूर्वजांची म्हण पाळण्यात पूर्ण केली. त्यापैकी एक कार्यतत्पर, मनमिळावू, अद्वितीय रायगडची कन्या ना. आदीतीताई तटकरे. रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यसम्राट खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या कन्या आहेत. ताईंनी एम. ए. पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यापूर्वीपासूनच आदितीताई राजकारणात सक्रिय आहेत. २००८-२००९ मध्ये वडिलांच्या प्रचार रॅलीत त्यांनी सहभाग घेतला होता. २०११-१२ मध्ये सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस वाढवायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी तरुणींना राजकारणात येण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत आदितीताईंनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस ज्वॉईन केली. आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. लहानपणापासूनच त्यांना राजकारणाचं बाळकडू वडिलांपासून मिळालं. वडील राजकारणात होते. त्यामुळे घरात राजकारणाचं वातावरण होतं. त्या वातावरणात वाढल्यानेच राजकारणाकडे त्या ओढल्या गेल्या. विलासराव देशमुख आणि शरद पवारांना अत्यंत जवळून पाहण्याची संधी मिळाली. शरद पवारांकडे सर्व पिढ्यांशी संवाद साधण्याची कला असल्यामुळे त्यांचे आजोबाा, वडील आणि त्यांच्यासोबत ते मनमोकळेपणाने संवाद साधतात. शरद पवार हेच आदितीताई यांचे राजकारणातील रोल मॉडल असल्यामुळे वडिलांपाठोपाठ शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा समोर ठेऊन त्या राजकारणात पुढे पूढे जात आहेत.
वडिलांची इच्छा असते मुलांनी राजकारणापासून लांब राहावं. त्यांनी संघर्ष पाहिलेला असतो. पण आदीतीताई यांच्याकडे संघटना वाढविण्याचे गुण अंगीकृत असल्याने त्यांनी संघटनेत काम करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांनीही आदीतीताईना राजकारणात येण्याची संधी दिली. २०१२ पासून त्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोकण विभाग संघटक म्हणून काम करत आहेत. २३ फेब्रवारी २०१७ रोजी रोहा तालुक्यातील वरसे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या पहिल्यांदा विजयी झाल्या. २१ मार्च २०१७ रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी दोन वर्षे काम पाहिलं.
२०१९ मध्ये श्रीवर्धनमधून आमदार म्हणून विजयी झाल्या होत्या. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी निर्माण करून राज्यात त्यांचे सरकार आणले. विशेष म्हणजे आदिती ताई पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या असताना रायगडच्या या कन्येला महाराष्ट्र राज्य उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क मंत्री तसेच रायगड जिल्हा पालकमंत्री पद मिळाले. आदितीताईना वयाच्या ३१ व्या वर्षीच त्यांच्यावर राज्य मंत्रीपदाची जबाबदारी आली. ताईंची राजकीय कार्यकिर्द रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून सुरुवात झाली होती. जिल्हा परिषदेत काम करत असताना त्यांनी रायगड जिल्हा गावोगावत जाऊन जाऊन घेतला होता. वडील खा. सुनील तटकरे महाराष्ट्र राज्यातील एक मुरंबी नेतृत्व असल्यामुळे ताईंच्या अंगी ही नेतृत्वाचे गुण उतरले आहेत.
कोकणात आलेलं निसर्ग वादळ असो, तौक्ते वादळ असो की महाड-चिपळूणमधील पूर असो. प्रत्येक ठिकाणी हजर राहून त्यांनी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. जगावर आलेल्या कोरोना संकटात त्यांनी आपल्या पालकमंत्री पदाची जबाबदारी योग्य त्या रीतीने पार पाडत रायगड जिल्ह्याच्या जनतेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. निसर्ग चक्रीवादळ, महापूरमध्ये जनतेला जास्तीत जास्त मदत मिळवून दिली. यामुळे अभ्यासू आणि धडाकेबाज मंत्री म्हणून आदिती तटकरे यांची ओळख आता संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे. अनेक खात्यांचा भार त्या सांभाळत असून या खात्यांना त्या न्यायही देत आहेत. अशा या कोकणच्या पुण्य भूमीत जन्मलेल्या आदिती ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील आयुष्यात यशाची उंच शिखरे चढत असताना त्यांच्या हातून रायगड तसेच कोकणच्या भूमीचे कल्याण होवो व त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
दिपक जाधव
सचिव महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस

0 टिप्पण्या