चिंचवड - जागतिक महिला दिनानिमित्त निर्भया सामाजिक संस्थेतर्फे कामगार भगिनींचा सत्कार


चिंचवड - प्रतिनिधी

निर्भया सामाजिक संस्था चिंचवड यांच्या संयुक्ताने आज जागतिक महिला दिनानिमित्त घरेलू कामगार भगिनींचा श्रीफळ व फुल देऊन सत्कार करण्यात आला.


अमृता फौंडेशनच्या अध्यक्षा सौ अमृता ताई विक्रांत नवले यांच्या हस्ते पुष्पा बनसोडे, हिंगाने आज्जी, सविता, पांचाळ, जयाताई यांना मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सुमनताई माने, उपाध्यक्षा सुनीता गोकुळे, नम्रता माने, संगीता गावडे,ज्योती सोनार, नंदा सोनवणे, मालती सिंग, शशी सिंग, काळे मॅडम, अपर्णा तेरकर, उषा दुर्गिश, सुनीता साबळे यांनी सहकार्य केले. नम्रता माने यांनी मनोगत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या