पंचलक्ष्मी इंग्लिश मीडियम स्कूल सिद्धनेर्ली मध्ये महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन..


पंचलक्ष्मी इंग्लिश मीडियम स्कूल सिद्धनेर्ली,यांच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये मुलांसाठी विज्ञान प्रदर्शन व खाद्य महोत्सव तसेच माता पालकांसाठी शाळेमध्ये पाककला स्पर्धा संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा,व फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते.



  कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे पालक श्री.सुनील माने सर व इतर पालक वर्ग यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शन विभागाच्या खोलीचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.

   विज्ञान प्रदर्शनासाठी मुलांनी विविध इलेक्ट्रॉनिक मॉडेल प्रतिकृती तसेच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु बनवल्या होत्या.

 तसेच खाद्यपदार्थांचे मुलांनी मांडलेले स्टॉल म्हणजे सर्वांसाठी खाऊगल्ली ठरली.पालक वर्ग व इतरांनीही त्याचा मनसोक्त आस्वाद घेतला या सर्वच उपक्रमांमध्ये सर्वांचाच प्रतिसाद उत्तम होता.

  नंतर महिलांची उखाणे स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये सौ.मीनाक्षी रवींद्र धरमोजे यांना प्रथम क्रमांक मिळवीला तर संगीत खुर्ची स्पर्धेत सौ.किरण संतोष मेटिल यांना प्रथम क्रमांक तर फनी गेम्स मध्ये फुगे फुगवण्याचे स्पर्धेत सौ. पूजा प्रवीण चौगुले यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

   पाककला स्पर्धेमध्ये सौ. सुषमा दिपक निकम यांचा प्रथम क्रमांक तर सौ. विद्या साताप्पा पोवार  व सौ. माधुरी प्रज्वलित गुरव यांना विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कुंभार एम एन मॅडम व शेवाळे एन एच मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक सौ .पाटील मॅडम यांनी केले.

  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ अरुणा पाटील मॅडम यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या