स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांना यश ; माणगाव येथील  गोळीबार करणा-या आरोपींना केले जेरबंद.

पोलीस प्रवाह न्यूज

                 त्या गोळीबाराचे कारण प्रेमप्रकरण.

रायगड : दि. १  - माणगाव शहरातील कचेरी रोड कॉर्नरवर शारदा स्वीटस दुकानासमोर ११ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजून १० मिनीटांनी झालेल्या गोळीबार प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात  कॉ.गु. रजि.नंबर २८/२०२२ भा.द.वि.स.कलम ३०७,३४ शस्र अधिनियम १९५९ चे कलम ३,२५ वगैरे प्रमाणे माणगाव पोलीस ठाणे येथे दिनांक १२ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयात गोळीबार करणारे  अज्ञात आरोपी यांचेविरूध्द,सोनी मेडिकल  माणगाव मध्ये  काम करणारे कामगार फिर्यादी दिपक रामकिशोर यादव,रा कचेरी रोड माणगांव हे काम करीत असलेल्या मेडीकल मालक शुभम ग्यानचंद जैसवाल,यांच्यासोबत रात्रीच्यावेळी मेडीकल बंद करून घरी परत येत असतांना एका काळी रंगाची पल्सर मोटारसायकल वरील अज्ञात दोन मोटार सायकलस्वार यांनी इंदापूर बाजूकडे जाण्यासाठीचा रस्ता विचारण्याचा बहाणा करून सोबत असलेल्या शुभम ग्यानचंद जैसवाल यास मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमांने त्याचे जवळील पिस्तुल शुभम ग्यानचंद्र जैसवाल याचे उजवे बाजुस पोटावर त्याला ठार मारण्याचे उद्देशाने गोळीबार करून मुंबई-गोवा महामार्गाने इंदापुर बाजुकडे पळुन गेले .म्हणुन तक्रार दिली होती. गुन्हयाचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक अशोक दुधे ,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड चे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, रायगड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम व स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखेकडील कर्मचारी यांचे तपास पथक तयार करण्यात आले होते.

सदर दाखल गुन्हयातील अज्ञात मोटार सायकलस्वार यांचा शोध घेतला असता सदर आरोपी यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेली काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल ही  माणगाव तालुक्यातील मौजे कळमजे गावचे रोडलगत नदी किनारी बेवारस स्थितीत मिळून आली होती. बेवारस मिळून आलेल्या मोटारसायकलच्या मालकाचा शोध घेतला असता, सदर मोटारसायकल ही वाशी पोलीस ठाणे हद्दीतून चोरी झाली असुन त्याबद्दल वाशी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं.४०/२०२२, भा.द.वि.स क.३७९ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निदर्शनास आले. सदर ठिकाणी मिळालेल्या फुटेजचे आधारे समांतर तपास करीत असताना दाखल गुन्हयातील जखमी  शुभम जयस्वाल यांचे वडील  ग्यानचंद जिउतबंधन जैसवाल यांस त्याचे फोनवर कोणत्यारी अज्ञात नंबर वरून, 2 दिवसात दोन करोड रूपये दे नाहीतर तुझ्या परीवारांस मुला प्रमाणे जिवेठार मारू असा धमकीचा कॉल आला. सदर बाबत माणगाव पोलीस ठाणे येथे  ४४/२०२१, भा.द.वि.स.क. ३८५, ५०७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

वरील दाखल गुन्हयातील आरोपी यांचे आलेल्या धमकीच्या कॉलचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी यांचा शोध घेतला असता सदर गुन्हा हा नवी मुंबई येथील ४ आरोपी यांनी मिळुन केल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गोळीबार करणेकरीता आरोपीत यांनी वापरलेला गावठी कटटा तसेच एक जिवंत राउंड आरोपीत यांचे कडुन हस्तगत करण्यात आलेला आहे.

   या प्रकरणात माणगाव पोलीस ठाणे येथे ४ आरोपींना अटक करण्यात आली त्यापैकी 

१. नाव   मयुर सुरेश गवळी, वय-२१, रा.नंदुचाळ, रूम नं.११७४, डायघर रोड, शिळफाटा, मुंब्रा, ठाणे.

२. अजय महादेव अवचार, वय.२०, रा.शंकरवाडी    चाळ,रूम नं.१०८ नौसिल नाका,रबाळे, नवी मुंबई.

३. राजेश विजय शेळके,वय.२२,रा.शंकरवाडी चाळ रूम नं.७१७,नौसिल नाका,रबाळे, नवी मुंबई.

४. नितीन शिरमाजी कांबळे,वय.२४ रा. शंकरवाडी चाळ रूम नं.७१७,नौसिल नाका,रबाळे, नवी मुंबई .अशी त्यांची नावे व माहिती आहे.     

सदर आरोपींवर  माणगाव पोलीस ठाणे गु.रजि.नं.२८/२०२२भा .द .वि.स.क.३०७,३४ शस्र अधिनियम१९५९ चे कलम ३, २५ प्रमाणे व माणगाव पोलीस ठाणे गु.रजि.नं.४४/२०२२ भा.द.वि.स.कलम ३८५,५०७ .प्रमाणे तसेच वाशी पोलीस ठाणे, नवी मुंबई गुन्हा रजि.नं.४०/२०२२ भा.द.वि.स.कलम ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

याप्रकरणातील आरोपी मयुर सुरेश गवळी याचे ज्याच्यावर गोळीबार करण्यात आला त्या शुभम जयस्वाल याच्या बहीणीशी असलेल्या प्रेम संबधात शुभम जैस्वाल  अडथळा करीत असल्याने त्याच्यावर गोळीबार केला असल्याची कबुली दिली आहे.

सदरची कामगिरी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनानुसार दयानंद गावडे, स्था.गु.अ.शाखा, रायगड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील, पोलीस उपनिरीक्षक संजय डोंबाळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम,सहाय्यक फौजदार गिरी, पोलिस हवालदार दिपक मोरे, पोलिस हवालदार सुधीर मोरे, पोलिस हवालदार अमोल हंबीर, पोलिस हवालदार प्रतीक सावंत, पोलिस हवालदार जितेंद्र चव्हाण, पोलिस नाईक ईश्वर लांबोटे, पोलिस अंमलदार अक्षय सावंत, पोलीस हवालदार देवराम कोरम व सायबर सेल शाखेचे पोलिस नाईक अक्षय पाटील, पोलिस नाईक तुषार घरत या पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. वरील गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र  पाटील माणगाव पोलीस ठाणे हे करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या