"अंनिस" तर्फे विज्ञान दिनानिमित्त निबंध स्पर्धा


 "अंनिस" तर्फे विज्ञान दिनानिमित्त निबंध स्पर्धा.


कोल्हापुर प्रतिनिधी ; पोलीस प्रवाह न्युज


महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कोल्हापुर "अंनिस" च्या वतीने जिल्हास्तरीय शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना खुली असणार आहे. स्पर्धेसाठी 'विज्ञानाची सृष्टी घेतली दृष्टीचे काय ? 'विज्ञान एक वरदान' त्याचबरोबर 'अंधश्रद्धा आणि विज्ञान' यापैकी कोणत्याही एका विषयावर स्वहस्ताक्षरात ५०० शब्दांचा निबंध मराठी भाषेत लिहून तो स्कॅन करून तो desai.ramsush@gmail.com ह्या मेल आयडीवर दिनांक ५ मार्च पर्यंत पाठवावा.

अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाच्या स्पर्धकांना अनुक्रमे १ हजार व ७०० रुपये ५०० रुपये अशी रोख बक्षिसे पुस्तक व प्रमाणपत्र देण्यात येईल.यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन कार्याध्यक्ष प्रमोद शिंदे त्याचबरोबर कृष्णात स्वाती (सरचिटणीस महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती) व हर्षद जाधव (सहसचिव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती) यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या