पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव : दि.९- माणगांव तालुक्यातील पन्हळघर बुद्रक ग्रामपंचायतची कोरोनाच्या लाँकडाऊ कालखंडा नंतरची पहिल्यांदाच ग्रामसभा पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायत कार्यलयात 26 जानेवारी ची तहकूब ग्रामसभा प्रशासक मिंडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि.9/2/2122 रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यलयात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक विस्तार अधिकारी मिंडे याची निवड करण्यात आली. नंतर मागिल ग्रामसभे मध्ये मतदार यादी चे वाचन झाले होते ते या सभेत इतिवृत्त ग्रामसेवक तेटगुरे यांनी वाचून दाखवले. यावेळी कषी अधिकारी बली मँडम बहुतांश आजी माजी पदाधिकारी, आदिवासीवाडी शाळेचे मुख्याध्यापक सुजित भोजने, पन्हळघर बुद्रक शाळेचे सहशिक्षक साईनाथ सोमवाड, अंगणवाडी सेविका, मदतनीस, व पन्हळघर बुद्रक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.
यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा संदर्भात विस्तार अधिकारी मिंडे यांनी सविस्तर ग्रामसभेत मार्गदर्शन केले. तर उपस्थित ग्रामस्थांना स्थकित घरपट्टी लवकरात लवकर भरण्यासाठी आव्हान केले.सभेमधील प्रत्येक प्रश्नाचे मिंडे यांनी सविस्तर माहिती देऊन चांगल्या प्रकारे ग्रामस्थांना मार्गदर्शन करून ग्रामस्थांनची मन जिंकली. व सन 22 ते 23 आराखडा संदर्भात माहिती दिली.
तसेच कृषी आधिकरी बळी यांनी शेवगा लागवड ,शेतीची मशागत, काजू लागवडीसाठी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. आणि गोपीनाथ मुंडे अपघात विमा,व तांत्रिक पध्दतीने शेती कशी करावी या संदर्भात ग्रामसभेत मार्गदर्शन केले.व नवीन समीती स्थापन करण्यासाठी सुचविले तर हि समीती पुढील ग्रामसभेत निवडली जाईल असे सुचविले .ग्रामसभेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ग्रामसेवक आदेश तेटगुरे यांनी केले.

0 टिप्पण्या