पोलीस प्रवाह न्यूज 

रायगड: दि १२ - माणगाव मध्ये २४ वर्षीय युवकावर अज्ञात इसमानी पिस्तूलमधून गोळी घालून जीवे ठार मारण्याचा प्रकार दि.  ११ फेब्रुवारी रोजी रात्री १२.१० वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की,माणगाव मधील औषधांचे व्यापारी सोनी मेडिकल चे मालक ग्यानचंद जैस्वाल यांचा २४-वर्षीय मुलगा शुभम ग्यानचंद जैस्वाल हा आपले मुंबई गोवा हायवेवर असलेले दुकान बंद करून कचेरी  रोड वरून पायी पायी घरी जात असताना कचेरी रोड कॉर्नर जवळ शारदा स्वीट दुकानासमोर आला असता,समोरून काळ्या रंगाची पल्सर गाडी घेऊन दोन अज्ञात इसम आले व त्यांनी शुमम जैस्वाल यांच्या जवळ येऊन गाडी  थांबवली व इंदापूर कडे जायचा रस्ता कुठे आहे असे विचारले .शुभम हा रस्ता दाखवत असतानाच पल्सर वर डबल शीट मागे बसलेल्या इसमाने.स्वतः जवळील पिस्तुल काढली व शुभम याच्या पोटा जवळ नळी लावून फायर केली.व ते २ अज्ञात  इसम मुंबई गोवा हायवेवरून इंदापूर बाजूकडे पलायन केले.यामध्ये शुभम जैस्वाल याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

   या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गु.र जि नं. २८/२०२२. भा .दं. वि. स कलम  ३०७ ,३४ व शस्त्र  अधिनियम १९५९ चे कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व पुढील तपास माणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर समद बेग हे करीत आहेत.