पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव दि. ९ - माणगांव पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अश्वनाथ खेडकर यांची बदली अलिबाग येथे प्रभारी अधिकारी जिल्हा वाहतुक शाखा रायगडला झाल्याने आता माणगांवचे पोलीस स्टेशनचा पदभार पूर्वी जिल्हा वाहतुक शाखेत प्रभारी असलेले पो. नि. राजेंद्र पांडुरंग पाटील यांनी स्विकारला आहे. त्यांची रायगडचे पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांचे आदेशानुसार नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.
माणगांव मधिल आपल्या वर्षभराच्या सेवा काळात पो.नि. अश्वनाथ खेडकर यांनी माणगांव मध्ये शांतता व सुव्यवस्था राखली, जनतेशी सौजन्य पूर्ण पोलीस-मैत्रीचे नाते जपले होते. ट्राफिक तसेच गुन्हेगारी विशेष म्हणजे कोरोना संकट काळातील जवळपास अखेरच्या टप्प्यातील सर्व परिस्थिती काळजीपूर्वक हाताळणारे वरिष्ठ पो. नि. अश्वनाथ खेडकर यांचे प्रमाणेच पो. नि. राजेंद्र पाटील यांचे कडुनही माणगांवकरांना सहकार्याची अपेक्षा आहे.
आज पहिल्यांदाच माणगांव तालुका पत्रकार सेवा संघाचे पत्रकार सदस्यांनी पो. नि. राजेंद्र पाटील यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करीत माणगांव मध्ये मनःपूर्वक स्वागत केले. पाटील यांनीही पत्रकारांशी बोलताना माणगांवकरांकडुन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. रायगड जिल्ह्यात येण्यापूर्वी पाटील हे दापोली, रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत होते. जेष्ठ नागरिक आणि महिलांसुरक्षा विषयक विशेष प्रयत्न करण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला असुन आदिवासी समाजासाठी चांगले मदतकार्य करुन त्यांचे सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करुयात असेही त्यांनी विश्वासाने आपले मत व्यक्त केले.

0 टिप्पण्या