कागल - श्रद्धा मॉडर्न स्कूल मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न...
श्रद्धा मॉडर्न स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कागल संचलित, दि.19 फेब्रुवारी 2022 रोजी अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.त्यामध्ये भव्य किल्ले प्रदर्शन भरविण्यात आले होते.मुलांना किल्ल्यांची रचना व किल्ल्यांची सद्यस्थिती कळावी हा माणस या प्रदर्शना पाठीमागे होता.
त्याचबरोबर कार्यक्रमाचा सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक.. यामध्ये शाळेचे विद्यार्थी शिवविचारांचा जागर करत या सुवर्णक्षणांचे साक्षीदार ठरत होते.यावेळी मोठ्या जल्लोषात,उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला..
संपूर्ण कागल तालुक्यामध्ये या देखण्या अशा कार्यक्रमाची वाहवा होत आहे... शिवराज्याभिषेक सोहळा व भव्य किल्ले प्रदर्शनासाठी मार्गदर्शक म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री नितीश पोतदार सर,सायली चौगुले मॅडम,सौ.सायली सावेकर मॅडम त्याचबरोबर आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक मा.श्री.सलीम मुजावर सर त्याचबरोबर संस्थापिका सौ. मुजावर मॅडम, प्राचार्या सौ सायली सावेकर मॅडम तसेच सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या