उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे अपंग प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन



पोलीस प्रवाह न्यूज 

रायगड दि. २४ -  दक्षिण रायगड जिल्ह्यातील अपंग व्यक्तींसाठी दिनांक २५ फेब्रुवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे अपंग प्रमाणपत्र वाटपाचे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

माणगाव तालुक्यातील तसेच दक्षिण रायगड जिल्ह्यातील अपंग लाभार्थ्यांना अलिबाग येथे जाऊन अपंगत्वाचे प्रमाणपत्र घ्यावे लागत असे मात्र यापुढे उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दर महिन्याचा दुसरा व चौथा शुक्रवार रोजी अपंग प्रमाणपत्र वाटप व तपासणी उपजिल्हा रुग्णालयात माणगाव येथे करणार असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रदीप इंगोले यांनी बोलताना सांगितले. तसेच दिनांक २५ फेब्रुवारी रोजी दक्षिण रायगड साठी अपंग प्रमाणपत्र वाटपाचे शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तसेच या शिबिरावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत हे शिबीर पार पडणार आहे. तरी दक्षिण रायगड जिल्ह्यातील अपंग व्यक्तीने याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर प्रदीप इंगोले यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या