उंदरवाडी येथे चारचाकीची दुचाकींना धडक होवून भीषण अपघात.

 

उंदरवाडी येथे चारचाकीची दुचाकींना धडक होवून भीषण अपघात.


कागल प्रतिनिधी/ओंकार पोतदार


उंदरवाडी ता.कागल येथे कारची दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला  आणि लहान मुलीचा मृत्यू झाला असून  अन्य दोघे जखमी झाले. छाया तानाजी पाटील (वय ४५, रा. नाधवडे, ता. भुदरगड) अन्विता प्रकाश कांबळे(वय ४) असे मृतांची नावे असून जखमीमध्ये चारजणांचा समावेश आहे. मुदाळ तिट्टा- सरवडे मार्गावर उंदरवाडीजवळ मंगळवारी आहेत. दुपारी साडेचार वाजता अपघात झाला.

त्रिलोक महादेव तांबे (वय ४३, मूळ रा. कणेरी, ता. करवीर, सध्या रा. कागल) हा चारचाकी (एमएच ०६ए डब्ल्यू ६६०२ ) घेऊन सरवडेकडून मुदाळ तिट्ट्याकडे चालला होता  मद्यधुंद अवस्थेत उंदरवाडी येथील ओढ्यानजीक ताबा सुटल्याने मुदाळ तिट्ट्याकडून सरवडेकडे चाललेल्या दोन दुचाकींना कारची धडक बसली. यानंतर कार  तुटलेल्या झाडाच्या बुंध्याला धडकून थांबली. या धडकेत दुचाकीवरील (एमएच ०९ सीएन ५४१९) नाधवडे (ता. भुदरगड) येथील जयवंत गणपती पाटील (वय २५) व त्यांच्या चुलती छाया पाटील गंभीर जखमी झाले. दुसऱ्या दुचाकीवरील (एमएच ०९ एजे ४७६२) आटेगाव (ता. राधानगरी) येथील प्रकाश शिवाजी कांबळे व त्यांची मुलगी अन्विता (वय ४) गंभीर जखमी , तसेच सविता नामदेव शिंदे (वय ३०) व नामदेव गुंडू शिंदे (४०, रा. फये, ता. भुदरगड) जखमी झाले

होते.अपघातानंतर सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून कोल्हापुरातील 'सीपीआर'मध्ये दाखल करण्यात आले. छाया पाटील आणि अन्विताचा या दोघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुख्य रस्त्यावर अपघात झाल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळाचा पंचनामा मुरगूड पोलिसांनी केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या