पोलीस 'रेझिंग डे' निम्मित विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन.

पोलीस प्रवाह न्यूज 

रायगड: दि. ८- पोलीस 'रेझिंग डे' अनुषंगाने माणगांव पोलीस ठाणे हद्दीतील वनवासी आश्रम शाळा माणगांव येथे दि. ७ जानेवारी रोजी इ. १० वी वर्गाच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांना कोव्हिडचे नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, मास्क लावावे सेनिटायझरचा वापर करावा याबाबत मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या. मोबाईलचा वापर, महिला अत्याचार विषयक माहिती, बालगुन्हेगारी, वाहतुकीचे नियमन याबाबत विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विध्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन केले. 

पोलीस व जनता यांनी एकजुटीने गुन्ह्यांना आळा घालावा या उद्देशाने  रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने माणगाव पोलीस ठाण्याच्या माध्यमातून दि. २ जानेवारी २०२२ ते ८ जानेवारी २०२२ दरम्यान 'रेझींग डे' चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच माणगांव पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर व त्यांची टीम महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक पोकळे पोलीस कॉन्स्टबल शाम शिंदे, रामनाथ डोईफोडे  यांनी माणगांव  मधील आश्रम शाळेला भेट देऊन विध्यार्थी व शिक्षक यांना शस्त्र बद्दल व वाहतुकीचे नियम याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच दामिनी पथक, बडी कॉप यांची कार्य शैली काय आहे याची सविस्तपणे माहिती दिली.  या सप्ताहमध्ये कायद्याचे प्रबोधन करणे, गुन्हासंबंधी माहीती देणे, पोलीस दैनंदिनी कामकाज नागरीकांसमोर मांडणे,  इ. अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आपल्या जिल्ह्यात या कार्यक्रमामध्ये तपास प्रक्रिया व कोर्ट कामकाज यावर लक्ष देऊन गुन्ह्यातील दोष सिद्धेचे प्रमाण वाढविणे तसेच राज्यातील जनतेसाठी सुरक्षित व निर्भय वातावरण तयार करण्यावर भर राहील याकडे लक्ष देण्यात यावे व आगामी वर्षात महिला, नागरिक, लहान मुले, अल्पसंख्याक समाजातील अशा घटकांचा सुरक्षित वातावरण तयार होईल असे प्रयत्न करून 'पोलीस रेझिंग डे' हा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या