"माती नात्याची पायवाट"- तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल. प्रा डॉ. राजन गवस - श्री.बी.जी.पाटील लिखित आत्मचरित्र ग्रंथाचे प्रकाशन ...


"माती नात्याची  पायवाट"- तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल. प्रा डॉ. राजन गवस -

   श्री.बी.जी.पाटील लिखित आत्मचरित्र ग्रंथाचे प्रकाशन ...


  सिध्दनेर्ली ता २-माती नात्याची पायवाट या श्री बी जी पाटील लिखित आत्मचरित्र ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी बोलताना डॉक्टर गवस यांनी सध्याच्या दिशाहीन तरुणाईवर परखड हल्ला चढविला. स्वार्थी राजकारणी आमच्या तरूणाईला व्यसनाधीन बनवत असून गावा-गातच नव्हे तर घराघरात गटातटाचे राजकारण करित असल्याचा घणाघाती प्रहार केला. यातून या तरुणाईला वाचवायचे असेल तर प्रत्येक गावात बी.जी .पाटलांसारखे चार-दोन लोक तयार झाले पाहिजेत. गावागावातील या तरुणाईने स्वार्थी पुढाऱ्यांच्या पाठीमागे फिरण्यापेक्षा पुस्तकांची कास धरावी आणि स्वतःचे भविष्य घडवावे.पुस्तकांनीच मस्तक घडते यावर त्यांनी भर दिला .अत्यंत कठीण परिस्थितीशी संघर्ष केलेले श्री बी जी पाटील यांचे हे वास्तव आत्मकथन काळजाला भिडणारे असून ते तरुण पिढीला प्रेरणा देणारे असल्याचे मनोगत अनेकांनी आपल्या भाषणात व्यक्त केले .

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री एन के मगदूम  होते .स्वागत अध्यक्ष म्हणून एम.बी.पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. 

   या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जी एस एफ सी चे वसोया, हुपरीचे श्रीकांत नाईक, अनिकेत देशमुख, सौ पूनम मगदूम, दत्तात्रय पांडुरंग पाटील, शहाजी पाटील, प्रा. सुनील मगदूम व एम.डी मगदूम, आदी मान्यवर उपस्थित होते. 

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. पल्लवी बाळासाहेब पाटील हिने केले,पुस्तक परिचय  टी.येस गडकरी यांनी करून दिला, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  बी.वाय.पाटील आणि तानाजी कवडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सागर पाटील यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या