पोलीस प्रवाह न्यूज
रायगड : दि. ८ - माणगांव तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या निजामपूर जि. प .गण व निजामपूर विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने विकासकामांचा धुमधडका सुरुच ठेवला आहे.या कामांमध्ये जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर येथील नळपाणी पुरवठा योजनेचे उदघाटन,बामणगाव येथील समाज मंदिराचे भूमीपूजन,जिते येथे अंगणवाडीच्या इमारतीचे भूमीपूजन या कामांचा समावेश होता,या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महाड पोलादपूर माणगांव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष चंद्रशेखर(बाबूशेठ) खानविलकर, निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे, महिला अध्यक्षा संगीता बक्कम, रा. कॉ. निजामपूर विभाग अध्यक्ष संदिप जाधव,निजामपूर विभाग सचिव किरण पागार,माजी उपसभापती तुकाराम सुतार.निजामपूर ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना नेते प्रसाद गुरव, देविका पाबेकर, नवोहर विद्यालय प्राचार्य, शिक्षकवृंद, विध्यार्थी, अधिकारी बुटाला, जिते सरपंच अंकुश गोळे, युवानेते सागर खानविलकर, यांच्या सह निजामपूर विभागातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी ,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
यावेळी जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर पाणी पुरवठा योजनेच्या उदघाटनप्रसंगी बोलताना खासदार सुनील तटकरे निजामपूर विभागातील जवळपास २० ते २५ गावातील नळपाणी योजनेच्या जलजीवन मिशन मधून या कामाचा आपण पाठपुरावा व प्रयत्न आपण करत असल्याचे सांगितले व भारत सरकारच्या योजना व राज्यसरकारच्या योजना यांची सांगड घालून निजामपूर विभागाच्या विकासाकरिता प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे सांगितले.यावेळी मुंबई सुरत या ठिकाणी राहणाऱ्या नोकरदार वर्गाबाबत स्वाभिमान असल्याचे वक्तव्य केले.आधुनिक व नवनविन उद्योग व रोजगाराच्या संधीची कशी निर्मिती करता येईल यासाठी भावी काळात प्रयत्न करणार.विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रांत नवं-नवीन उद्योग आणून भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी भविष्यात उपलब्ध करून देण्याचा मानस देखील व्यक्त केला.डोंगरी विकास योजनेतून पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून मिळविण्यासाठी श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रातील निधीपेक्षा भरीव निधी निजामपूर विभागातील बाबूशेठ खानविलकर यांच्यासह अनेक राष्ट्रवादी पदाधिकारी आग्रही राहिले असल्याने खासदारांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
बामणगाव समाजमंदिराच्या भूमीपूजन प्रसंगी बोलताना महाड विधानसभा अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर यांना खुणावत सर्व बाबी पूर्ण करत या समाज मंदिराचे उदघाटन कार्यक्रम ३१ मार्च २०२२ अखेर घेण्याचे निर्देश दिले.या समाजमंदिरा चा उपयोग महिला व युवक यांच्याकरिता नवनविन उपक्रम हाती घेण्यात आले पाहिजेत असे देखील वक्तव्य केले. अजुन पाच दहा वर्षांमध्ये निजामपूर चे चित्र बदलणार आहे जसा मागील १० वर्षात निजामपूर विभागाचा कायापालट झाला.या बदलत्या चित्रामध्ये आम्हाला पुणे मुंबई की कुठलीही बाहेरची माणसं नको आहेत!त्या ठिकाणी स्वकर्तृत्वाने स्व शिक्षणाने मोठा झालेला युवकच त्या ठिकाणी असला पाहिजे असे विधान देखील खासदार सुनील तटकरे यांनी केले. गेली ३० /३५ वर्षे बामणगाव मधील ग्रामस्थ माझ्या पाठीशी उभे राहिले तसाच आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवावा असे मत व्यक्त व्यक्त करत खासदार तटकरे यांनी दिवंगत माजी जि.प सदस्य चंद्रकांत गोपाळ यांच्या आठवणी जाग्या करून त्यांना उजाळा दिला व आदरांजली व्यक्त केली.
जिते ग्रामपंचायत हद्दीत अंगणवाडी इमारतीच्या भूमीपूजनावेळी बोलताना गेल्या २५ /३० वर्षात जिते बोरमाच विभागाच्या विकासाशी माझी नाळ जोडली गेली असल्याचे सांगितले.व पक्षाचे या विभागाचे नेतृत्व बाबूशेठ यांच्याकडे सोपावले गेले आहे जेणेकरून या दुर्गम भागांचा विकास व्हावा.जिते गावच्या परिसरातून भोर घाटाला जोडणारा मार्ग देखील प्रस्तावित असल्याचे मत व्यक्त केले.याच वेळी मुबई पुणे सुरत सारख्या ठिकाणी यासारख्या ग्रामीण भागातील नागरिकानी आपले स्थान निर्माण केले त्याबद्दल गौरवोद्गार काढले.बोरमाच ला जाणारे २ साकव एकाच वेळी मंजूर केल्याची ग्वाही देखील खासदारांनी दिली. याच वेळी जिते गावातील कार्यक्रमामध्ये विभागातील ग्रामपंचायत पोटनिवडणूकिमध्ये विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सदस्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.विभागात येणाऱ्या कारखानदारीमध्ये कौशल्य व तंत्रज्ञान विकसितअसणारा आमचा स्थानिक कामगार कसा लागेल याकरिता प्रयत्नशील राहणार असल्याचे देखील सांगितले.उंबर्डी अंगणवाडी दुरुस्ती साठी लागणारा तातडीने उपलब्ध करून देण्याचे देखील वचन दिले.व सहकाऱ्यांच्या सहाय्याने संघटित राहून विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे देखील वचन उपस्थितांना देण्यात आले.

0 टिप्पण्या