*उस्मानाबाद* :-- प्रतिनिधी
*सन 2014 पासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेले राखीव पोलीस निरीक्षक ( RPI ) यांना लवकरात लवकर सशस्त्र पोलीस उपअधीक्षक ( R - DYSP ) पदी पदोन्नती देण्यात यावी या मागणीचे निवेदन आज दिनांक 06 / 01 / 2022 रोजी पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांचे मार्फत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की, राज्य पोलीस दलात 2014 पासून राखीव पोलीस निरीक्षक यांची सशस्त्र पोलीस उपअधीक्षक पदाची पदोन्नती सात वर्षांपासून प्रलंबित असून अद्यापही यावर कोणताही निर्णय झाला नसून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेले हे अधिकारी सेवानिवृत्तीच्या उंबरठयावर उभे असून सेवानिवृत्त होण्याच्या अगोदर यांचे पोलीस उपअधीक्षक होण्याचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करावे. पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रातून सन 2018 मधे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले होते.
तसेच सन 2019 - 2020 - 2021 मधे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यंत्री अजित पवार , माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच आपल्याला सुद्धा वारंवार या मागणीचे निवेदन देऊन याचा पाठपुरावा करून आंदोलनेही करण्यात आली होती, आमच्या या निवेदनाची दखल घेऊन जिल्हा पोलीस दलातील राखीव पोलीस निरीक्षक यांना सशस्त्र पोलीस उपअधीक्षक या पदावर पदोन्नती देण्याकरिता मा. पोलीस महासंचालक साहेब , महाराष्ट्र राज्य मुंबई , ( कक्ष - 26 ब ) यांची कार्यालयामार्फत गृहविभाग महाराष्ट्र राज्य येथे पदोन्नती बाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. तरीसुद्धा या प्रस्तावावर कोणताही निर्णय झाला नसून हा प्रस्ताव तसाच पडून आहे, तरी गृहमंत्री साहेबांनी या विषयाकडे लक्ष घालून यांची लवकरात लवकर पदोन्नती करावी व सेवानिवृत्तीच्या अगोदर यांचे पोलीस उपअधीक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण करावे, असे म्हटले आहे. यावेळी निवेदन देताना उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष इम्तियाज शेख , प्रवीण जाधव , अभिजित देडे , कलीम शेख यांची उपस्थिती होती*

1 टिप्पण्या
सुरपर से उपर कामगिरी
उत्तर द्याहटवावाघ्या आमच्या पदोन्नती च्या आश्या पुन्हा एकदा प्लवीत झाल्या।आता SRPF च्या मागण्या प्रमाणे आमच्या मागण्या सुध्दा पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद, आभारी आहोत. जिल्ह्या सशस्त्रदल.👍