कोल्हापूर - साके येथे आठवडी बाजार सुरू

फोटो ओळ ः साके येथे आठवडी बाजाराचे फित कापून उदघाटन करतानां सरपंच सैा.सुशिला पोवार,उपसरपंच निलेश निऊंगरे किरण पाटील,बाळासाहेब तुरंबे,ज्ञानदेव पाटील,मारूती निऊंगरे आदी.

पोलीस प्रवाह न्युज

कोल्हापुर प्रतिनिधी ; विवेक पोतदार

ग्रामपंचातीचा उपक्रम ; नागरीकांचा उत्फुर्त प्रतिसाद, लाखोंची उलाढाल

कोल्हापुर प्रतिनिधी ; साके ता.कागल येथे ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून व नागरिकांच्या मागणीनुसार गावात आठवडी बाजार नुतन वर्षाच्या पहिल्या रविवार पासुन सुरूवात करण्यात आली.

पहिल्याच बाजाराला खरेदीसाठी झालेली गर्दी.

साके गावामध्ये भाजी पाला पिकवणारे शेतकरी आहेत त्यांना विक्रीसाठी बाहेरील गावांमध्ये जायला लागत असे तर स्थानिक ग्रामस्थांना देखील भाजी-पाला व खरेदी करण्यासाठी पंचक्रोशीतील आठवडी बाजारात जायला लागत असे जाताना होण्या-या वेळखाऊ व खर्चीक प्रवासाचा विचार करून गावातील नागरिकांना सेवा देण्याच्या हेतुने ग्रामपंचायतीच्या विशेष प्रयत्नातून नुतन वर्षाच्या पहिल्या रविवारपासुन आठवडी बाजार उपक्रमाला सुरूवात करण्यात आली.

या पहिल्याच आठवडी बाजारात पालेभाज्या,फळे,खाद्यपदार्थ,मसाले,कपडे,ईलेक्ट्रीक वस्तुंचे स्टॅाल लावण्यात आले होते.बाजारात लाखोंची उलाढाल झाली. बाजारातील नागरिकांना मोफत चहा-पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली.

यावेळी आठवडी बाजाराचे फित कापुन उद्घाटन सरपंच सुशीला पोवार,बाळासाहेब तुरंबे,उपसरपंच निलेश निऊंगरे,किरण पाटील,ज्ञानदेव पाटील,आक्काताई चौगले,युवराज पाटील यांनी केले तर ह्यावेळी सुजय घराळ,रविंद्र जाधव,अशोक सातुसे,चंदर काळू निऊंगरे,तानाजी चैागले,रंगराव चैागले,मारूती पाटील,आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या