खांडपाले गावात तीन दिवसीय सप्ताह सोहळा संपन्न

पोलीस प्रवाह न्यूज 

रायगड: दि. ९ - माणगांव तालुक्यातील खांडपाले गावात नुकताच कार्तिकी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संपुर्ण राज्यातूनच नव्हे तर देशभरातून अथांग वारकरी सांप्रदायिक भागवत धर्माच्या पताका हाती मिरवत विठ्ठलभक्तीच्या नादात, टाळ मृदंगासहीत अभंग व भजणे गात कार्तिकी व आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरची वाट धरतात.  परंतु, प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या खांडपाले गावातील या विठ्ठलाच्या भव्य मंदिरात एकादशीनिमित्त पूर्वापार  असाच भव्यदिव्य नेत्रदीपक सोहळा ग्रामस्थ व परिसरातील असंख्य भाविकांच्या   उत्साहात  पार पाडला जातो. ज्या भाविकांना दूर पंढरपूरला जावून विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य होत नाही असे या तालुक्यातील बहुतांश वारकरी गेली अनेक वर्षापासून   खांडपाले गावात महाराष्ट्राचे अराध्य दैवत भगवान विठ्ठलाच्या नामस्मरणासाठी व दर्शनासाठी कार्तिकी एकादशी दिवशी व सप्ताहाच्या निमित्ताने एकत्रित येऊन भक्तिभावाने दर्शन घेतात.

गावातील समाजसेक,  प्रतिष्ठीत ग्रामस्थ आणि इतर मान्यवर मंडळी यांच्या नेतृत्वाखाली कार्तिकी एकादशीनिमित्त अनेक वर्षांपासून  भाविकांसाठी सप्ताह सुरू करण्यात आला. या सप्ताहामध्ये विशेषतः गावातील शिगवण भावकी नेहमीच मोलाची भूमिका बजावत आली आहे. खांडपाले गावात या धार्मिक सप्ताहनिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करून समस्त भाविक, आबालवृद्ध मनमुरादपणे आनंद घेतात. द्वादशीला काळ्याच्या किर्तनाने  कोरोनाचे नियम पाळून सांगता झाली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या