प्रतिनिधी - रावेत
युवा नेते कुणाल मोरेश्वर भोंडवे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन व साफसफाई कामगार महिला भगिनींचा "कोरोना योद्धा पुरस्कार" देऊन सन्मान केला.
७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यमान नगरसेवक श्री.मोरेश्वर भोंडवे व भाऊप्रेमी प्रतिष्ठान च्या माध्यमातून "भव्य रक्तदान शिबिर" आकुर्डी-गुरुद्वारा चौक येथे आयोजित केले होते. त्याचे उदघाटन युवानेते "कुणाल मोरेश्वर भोंडवे" यांच्या हस्ते पार पडले. तसेच या प्रसंगी महानगरपालिकेतील साफसफाई कामगार महिला भगिनींचा "कोरोना योद्धा पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी अर्जुन गायकवाड, सागर बोबडे, राहुल कांबळे, संभाजी मस्के,अविनाश सुर्यवंशी, निखिल वाघमारे, गणेश गोरे, विशाल गायकवाड,बंटी टाकळेकर, संजय भोंडवे, काशिनाथ मेस्त्री, प्रभू कांगणे, हितेश चौधरी, प्रशांत लोटेकर, बंडु मरकड, संग्राम नागरे, महेश मस्के, संकेत कोपर्डे, सत्यवान यादव व मित्र परिवार उपस्थित होते. शिबिरासाठी डॉ. श्री.सागर काटकर यांचे विशेष सहकार्य लाभले. वेळेची गरज व सामाजिक भान लक्षात घेऊन प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.

0 टिप्पण्या