महाराष्ट्र पांचाळ सोनार समाज महामंडळ, आणि वाचन चळवळ महाराष्ट्र राज्य, यांचे कडून शारीरिक शिक्षण दिनानिमित्त डोंगरी विभागातील मुलांना आवश्यक क्रीडा साहित्य, डबल बार, सिंगल बार, कॅरम, आणि खाऊचे वाटप करण्यात आले. डोंगरी दुर्गम भागातील मुलांना पोलीस भरती, आर्मी भरती,साठी इच्छा असूनही आवश्यक ती साधने न मिळत नव्हती. त्यांची ती अडचण ओळखून वाचन चळवळअध्यक्ष राहुल वेदपाठक, आणि पांचाळ सोनार समाज महामंडळ यांचेकडून आरळा येथील गांधी धाम विद्यालय, आणि बेंद्रे वाडी येथील शाळेतील मुलांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.
या वेळी वाचन चळवळीचे अध्यक्ष राहुल वेदपाठक, सोनार समाज महामंडळ चे अध्यक्ष प्रकाश पोतदार,राज्य खजिनदार संजयजी क्षीरसागर, वाचन चळवळीचे उपाध्यक्ष पाटील सर, ग्रामस्थ, बंडगर सर, चौगले सर यांची विशेष उपस्थिती होती. उपक्रम शील शिक्षक बंडगर सर यांनी आभार मानले.

0 टिप्पण्या