कोल्हापूर - खाऊच्या साठवलेल्या पैशातून जन्मदिनी शाळेस रोपे भेट :- चिमुकलीचा आदर्श उपक्रम

 

खाऊच्या साठवलेल्या पैशातून वाढदिनी शाळेस रोपे भेट दिले ..

          वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक विशेष उत्साहाचा दिवस असतो मग तो कुणी लहान असो किंवा मोठा,पण सक्षम व समृद्ध विचार हे अभिनव कृती करण्यास भाग पडतात. असंच काम

श्रद्धा मॉडर्न स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कागल मधील कुमारी वैष्णवी विशाल घाटगे. इयत्ता दुसरीची विद्यार्थिनीने  केलेले आहे.

                 वाढत्या प्रादुर्भावाची गरज ओळखून झाडे लावली पाहिजेत असा मानस तिच्या या उपक्रमातून दिसून आला.

 अध्यात्म,संस्कृती व विज्ञान या तिन्ही गोष्टीनी परिपूर्ण असलेल्या वडाचे झाड निश्चितच सक्षम विचाराने डौलदार वाढेलच तिच्या या विचारापाठीमागे तिचे आई-वडील व शिक्षक यांचाही वाटा आहे तिच्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.. याप्रमाणेच सर्वांनी आपण वैष्णवी चा आदर्श घेत आपण हीच झाड लावून पाऊल पुढे टाकले पाहिजे... 

   या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक मुजावर सर मुख्याध्यापिका सावेकर मॅडम, नितीश पोतदार सर सर्व शिक्षक,पालक उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या