पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि. २३ - माणगांव तालुक्यातील पहेल ग्रामपंचायत कार्यालयात आज सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचारी एकवटुन मोठ्या उत्सहात देशाला स्वातंत्र्य मिळवुन देणारे स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता म्हणुन हा दिवस 'पराक्रम दिवस' म्हणुन साजरा केला जातो. आज २३ जानेवारी रोजी त्यांचे १२५ व्या जयंती निमीत्त तसेच आज दुसरे महाराष्ट्रातील महानायक हिंदु हृदय सम्राट-सरसेनापती-शिवसेना प्रमुख स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती दिना निमीत्त त्यांचे फोटोला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच अनिल केसरकर, ग्रामसेविका ढेपे, सदस्य तसेच कर्मचारीवृंद पायल पहेलकर, तेजेस मांजरे उपस्थित होते.

0 टिप्पण्या