कोल्हापुरात - द दारूचा नाही ! द दुधाचा! ! उपक्रम यशस्वीरित्या संपन्न....
नविन वर्षाचे स्वागताचा दिवस, ३१ डिसेंबर ! मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची प्रथा आहे. आणि यावेळी मदयाचे सेवन मोठ्या प्रमाणात होत असते. याच दिवशी तरुण मोठ्या प्रमाणात व्यसनांची सुरुवात करतो. सहज म्हणून, मजा म्हणून, पार्टी म्हणून दारू पिली जाते. *पहिला घोट* याच दिवशी ओठाला लावला जातो. आणि व्यसनाधिनतेकडे वाटचाल सुरु होते. यामुळे आजच एक कृतिपुर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
गोकुळ शिरगाव एम. आय. डी. सी. मधील *विलो मँथर प्लॅट लि.* या कंपनीतील कामगारांसाठि आयोजन केले होते. यावेळी मा. मिलिंद खरे (प्लँट हेड) मा. विजयानंद सोनटक्के (डेप्युटी. प्लांट हेड) , मा. चैतन्य सहस्त्रबुद्धे (डी.जी.एम.) मा. विजय शिंगाडे (कामगार कल्याण अधिजारी), मा. संदिप सावंत (एच.आर. आॅफिसर) आणि युनियन लिडर मा. रमेश चोथे. हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मा. विजय शिंगाडे यांनी कार्यक्रम आयोजनाचा हेतु सांगून व्यसनांचे दुष्परिणाम मांडले. मा. मिलिंद खरे यांनी कामगारांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. व्यसन व त्याची वाढती लोकप्रियता तसेच तरूण पिढीचे व्यसनात वाहवत जाण्याचे विदारक दृष्य. या अंगाने मांडणी केली.
कामगारांनी दारू न पिता ३१ डिसेंबर साजरा करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी दारूच्या बाटलीची प्रतिकृतीला कपड्याने मारा ही कृती करण्यात आली. कामगारांना जोडे मारून व्यसनांना बदनाम केले. तसेच *गोकुळ दुध संघ, कोल्हापूर* यांचेवतीने मोफत दिलेले सुगंधी दूध कामगारांना मान्यवरांचे हस्ते वाटप केले. व हे केवळ दुध वाटप कार्यक्रम नसून "दारु नको! दुध प्या!" असा संदेश दिला.
कंपनीतील १०० कामगार व कर्मचारी उपस्थित होते. दारू नको दुध प्या! या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे आयोजनात गोकुळ दुधचे *गुणवंत कामगार मा. शाहीर सदाशिव निकम* यांनी दुध व्यवस्थापन करुन मोलाची मदत केली. तसेच कल्याण निरीक्षक मा. राजेंद्र निकम, मा. विजय खराडे, मा. धनश्री चौगुले, मा. लता कांबळे यांनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या