इलेक्ट्रिक दुचाकींना लागली आग, :- 5 लाखाचे नुकसान...

 

इलेक्ट्रिक दुचाकींना लागली आग, 5 लाखाचे नुकसान..

  कोल्हापूर - नागाळा पार्क परिसरातील अक्षय पार्क येथे एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेल्या 8 इलेक्ट्रिक नवीन बाईक जळून खाक झाल्या. या आगीत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस अक्षय पार्कमध्ये प्राईम रोज अपार्टमेंट येथे प्रदीप जाधव हे राहतात. ते गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक बाइक विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या बारा इलेक्ट्रिक बाइक प्राईम रोज अपार्टमेंट पार्किंगच्या बाजूला लावून ठेवल्या होत्या. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास यातील एका इलेक्ट्रिक बाइकने पेट घेतला. या बाईक एकमेकाला लागून असल्यामुळे जवळपास आठ गाड्या जळून खाक झाल्या. या दुर्घटनेमध्ये सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. 

  अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने अन्य इलेक्ट्रिक बाइक आगीपासून वाचल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या