चिंचवड:- प्रतिनिधी
डेक्कन स्पोर्ट क्लबच्या वतीने ट्रायथलॉन स्पर्धेचे आयोजन कोल्हापुर येथे केले होते. यामध्ये १.९ किलोमीटर पोहणे,९० किलोमीटर सायकल चालवणे व २१ किलोमीटर धावणे असा प्रवास होता.या सर्व गोष्टी ८ तास ३० मिनीटात पूर्ण करणे अशा स्वरुपाची स्पर्धा होती.३० जानेवारी रोजी कोल्हापूर येथे ही स्पर्धा पार पडली.या स्पर्धेला राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
विविध भागातुन १५०० स्पर्धकानी विविध स्पर्धेत सहभाग घेतला.या स्पर्धकामध्ये १८ वर्ष ते ७२ वर्षाचे स्पर्धक सहभागी झाले होते .यामध्ये पुणे शहरामधून सर्वाधीक स्पर्धक सहभागी झाले होते.पिंपरी- चिंचवड मधील इको पेडलर सायकल क्लबचे सदस्य देवेंद्र चिंचवडे,राहुल नलावडे,राजेश शेटे, हेमंत निकम, अथर्व चिंचवडे व हर्षद निकम यांनी हि स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.या स्पर्धेसाठी बाबा भोईर,शंकर उणेचा व शंकर गाढवे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. दिपक पासलकर यांनी स्पर्धाकांना मोलाचे सहकार्य केले.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केल्याचे स्पर्धाकांनी सांगितले.नियमित सराव करून या स्पर्धेत शहरातील स्पर्धक सहभागी झाले होते.स्पर्धा पूर्ण केल्याने विविध संघटना व नागरिकांकडून त्यांचे अभिनदंन केले जात आहे.

0 टिप्पण्या