प्रतिनिधी - शिर्डी
पोलिस प्रशासनात अनेक अधिकारी आपापल्या सेवेच्या ठिकाणी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावतात मात्र त्यातील काहींच्या नशिबी आपल्या कर्तृत्वाच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर बदली अथवा सेवानिवृत्तीच्या वेळी अतिशय आदराची वागणूक मिळत साश्रुनयनांनी निरोप सहकारी कर्मचारी देत असतात मात्र असा प्रसंग अपवादानेच एखाद्या नशीबवान अधिकाऱ्याच्या नशिबी येतो
असाच एक प्रसंग आज शिर्डी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे यांच्याबाबत घडला. नारायण न्याहळदे यांची दुहेरी पदोन्नती होत उपविभागीय पोलिस अधिकारी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी पदोन्नती देण्यात आल्याने त्यांचा निरोप समारंभ शिर्डी पोलिस स्टेशनला वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांतर्फे ठेवण्यात आला होता. यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले असल्याचे दृश्य पाहून स्वतः न्याहळदे आणि उपस्थित तिन्ही अधिकाऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले.अतिशय भावनिक असा हा निरोप समारंभ झाला.
यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले की अनेक अधिकारी वरिष्ठ म्हणून येतात मात्र कधी कठोर तर कधी मवाळ भूमिका घेत अधिकारी आपल्या आपल्या कार्यपद्धतीने कारगिर्द पूर्ण करतात मात्र न्याहळदे साहेबांनी आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना एका कुटुंब सारखं प्रेम आणि लहान भावासारखी प्रत्येकाची काळजी घेत कौटुंबिक सुख दुःखात नेहमीच मदत केली आणि असे अधिकारी अगदी अपवादाने कर्मचाऱ्यांच्या नशिबी येतात.
अनेकांना भावना व्यक्त करतांना आपला हुंदका अवर्ता आला नाही. आणि बोलतांना शब्द सुद्धा फुटत नव्हते असा हा भावनिक प्रसंग पाहून स्वतः नारायण न्याहळदे यांना सुद्धा या कर्मचाऱ्यांच्या प्रेमाचा निरोप पाहून जवळील रुमालाने डोळे पुसण्यास भाग पाडले.
अश्या ह्या प्रामाणिक आणि वर्दी पलीकडला माणूस असलेला अधिकारी शिर्डी शहराला लाभला याचा सर्व ग्रामस्थांना नागरिकांना आणि पोलिस खात्याला सुद्धा अभिमान आहे उपस्थित प्रत्येकाने साई चरणी पुढील कारगिर्द सुखाची जावो आणि साहेबांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना केली

0 टिप्पण्या