पाट्या कोणाच्या पण नावाच्या लागो पाणी पाजण्याचे काम आम्ही करतो- आ. जयंत पाटील.

माणगाव तालुक्यातील विविध विकासकामाचे  शेकाप सरचिटणीस आ. जयंत  पाटील यांच्या हस्ते भूमिपूजने संपन्न

रायगड: दि. ४ - माणगांव तालुक्यातील महत्वाचा समाजला जाणारा मोर्बा जि. प. मतदार संघ. या मतदार संघात होणाऱ्या ११ विविध विकासकामांची उदघाटने व भूमीपूजने ४ डिसेंबर रोजी शेकाप आमदार जयंत  पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उमरोली येथे नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन करताना आ. पाटील म्हणाले की, पाट्या कोणाच्या पण नावाच्या लागो पाणी पाजण्याचे पुण्याचे काम आम्ही करीत आहोत. हे सुज्ञ नागरिकांना माहीत आहे. आम्ही आमच्या नावासाठी की मतासाठी काम करीत नसून जनतेच्या सेवेसाठी शेकाप काम करतो.

रानवडे गाव येथील गणेश मंदिरात व राजीवली गाव सोनभैरव येथे जाहीर सभा घेण्यात आली. ही विकासकामे आमदार जयंत पाटील माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा चिटणीस अस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जि. प. सदस्या  आरती मोरे, माणगाव तालुका  शेकाप चिटणीस रमेश मोरे यांच्या प्रयत्नाने साकार होत आहेत. बाकी पक्ष वळगण्या घालत आहे की, ही सगळी कामे आम्ही केली आहेत. ही विकासकामे फक्त शेकापनेच केली आहेत  असे मत मनोगतात रमेश मोरे यांनी व्यक्त केले आहे.

या कामात एकूण ११ विविध विकासकामांची भूमिपूजनांचा यामध्ये समावेश आहे. त्यामध्ये निवाची नळेफोडी येथील रस्ता डांबरीकरण करणे, चांदोरे येथील कुणबी समाज सभागृह दुरुस्ती, पळसप येथील रस्त्याचे कार्पेट करणे, डोंगरोली वरचीवाडी येथील रस्ता डांबरीकरण करणे, मोर्बा येथे संरक्षक भिंत बांधणे, मोर्बा राऊत मोहल्ला येथील रस्ता डांबरीकरण करणे, मोर्बा  येथे सामाजिक सभागृह बांधणे, मोर्बा मराठा आळी सामाजिक सभागृह बांधणे, राजीवली येथे सामाजिकसभागृह बांधणे, राजीवली येथील रस्ता डांबरीकरण करणे, उमरोली खरवली नळपाणी योजना, उमरोली येथे अंगणवाडी उदघाटन या विकासकामांचा समावेश आहे.

      

शेकाप पक्ष हा मतांसाठी लढणारा पक्ष नाही तर लोकांच्या हितासाठी लढणारा पक्ष आहे असे मत आमदार जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. तसेच या जि. प. मतदारसंघात रमेश मोरे यांनी शेकाप पक्ष वाढवला त्याबद्दल कौतुक करण्याचे देखील आमदार जयंत पाटिल विसरले नाहीत. या कार्यक्रमाकरिता आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित  पाटील यांच्या समवेत ऍड. राजीव साबळे, माजी जि. प. सदस्य अस्लमभाई राऊत, जे बी सावंत एज्युकेश सोसायटी कार्यवाह नानासाहेब सावंत, चांदोरे ग्राम पंचायत सरपंच तृप्ती चांदोरकर, माणगांव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय पंदेरे, जेष्ठ कार्यकर्ते अशोक गायकवाड, विजय आमरे,गोविंद पवार यांच्या सह मोर्बा विभाग जि. प. मतदार संघ, व रानवडी गाव, बाट्याची वाडी ,एकंदरीत मोर्बा जि प मतदार संघातील असंख्य नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून उपस्थित होते. यावेळी मोर्बा जि. प. मतदार संघाच्या कार्यक्षम जि. प.  सदस्या आरती मोरे व तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी आमदार जयंत पाटिल व जि. प. सेस फंड यातून बहुतांशी निधी या मतदारसंघात वापरल्याने त्यांचे तोंडभरून कौतुक केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या