मुरगूड प्रतिनिधी/ओंकार पोतदार
वाढत चाललेल्या ओमायक्रॉन रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निपाणी फोंडा मार्गावरील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असणाऱ्या लिंगनूर (कापशी) येथे मुरगूड पोलिसांनी चेकपोस्ट नाका उभारला आहे. येथे निपाणी कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. आवश्यक प्रमाणपत्र असणाऱ्या प्रवाशांनाच महाराष्ट्रातप्रवेश दिला जात आहे. अनेकांना परत पाठविले आहे.
निपाणी फोंडा मार्गावरील लिंगनूर (कापशी) येथे मुरगूड पोलिसांनी चार दिवसांपासून तपासणी नाका उभारला असून, कर्नाटकातून येणाऱ्या सर्व वाहनांची येथे कसून तपासणी केली जात आहे. याबाबत फार काळजी घेतली जात आहे.कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या सर्वांचे कोरोनाचे दोन डोसकिंवा आरटी पीसीआर टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच महाराष्ट्रात प्रवेश दिला जात आहे.
कोरोनाचे दोन डोस न घेतलेले किंवा आरटी पीसीआर नसलेल्या वाहनचालकांना लिंगनूर नाक्यावरून परत पाठविले जात असल्याची माहिती मुरगूड पोलिसांनी दिली आहे. या नाक्यावर चोवीस तास अधिकारी व पोलीस गस्तीसाठी असतात असे सांगण्यात आले.

0 टिप्पण्या