छ. शाहू साखर नुतन संचालक प्रा. सुनील मगदूम यांचा निसर्ग व पर्यावरण संघटनेच्या वतीने सत्कार.


छ. शाहू साखर नुतन संचालक प्रा. सुनील मगदूम यांचा निसर्ग व पर्यावरण संघटनेच्या वतीने सत्कार. 

  देशातील अग्रेसर अशा श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे दिवंगत राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या कार्याचा, विचारांचा व कृतीचा  वसा आणि वारसा जपत उत्तम व्यवस्थापनाखाली सुरू असलेल्या व राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराण्याचे वंशज मा. समरजितसिंह घाटगे  यांनी  ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांच्या हिताचा विचार करून या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केले बद्दल मा. समरजितसिंह घाटगे राजेसाहेब यांचे अभिनंदन करून प्रा. सुनील मगदूम (सर) सिध्दनेर्ली यांची शाहू साखर कारखान्याच्या नुतन संचालक पदी निवड झाले बद्दल निसर्ग व पर्यावरण संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

   यावेळी बोलताना कॉम्रेड शिवाजीराव मगदूम म्हणाले, सिध्दनेर्ली गावातील लोक प्रतिनिधीची शाहू साखर कारखान्याच्या संचालक पदी निवड हा संपूर्ण सिध्दनेर्ली करांचा गौरव आहे. त्याचबरोबर स्वर्गीय एस. के. मगदूम सर यांच्या विचारांचे पाईक असलेले प्रा. सुनील मगदूम सर परीसरातील ऊस उत्पादक शेतकरी हिताचा नक्कीच विचार करतील व मिळालेल्या संधीमुळे गटाला उर्जितावस्था येईल असे निसर्ग व पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष मधुकर येवलुजे म्हणाले व यावेळी वृक्षसंवर्धन संघटनेचे अध्यक्ष अमृत पाटील यांच्या हस्ते प्रा. सुनील मगदूम यांचा सत्कार करण्यात आला तर आभार सुधीर पाटील यांनी व्यक्त केले. 

   यावेळी श्रीयुत संदिप गुरव सर चेअरमन सिध्देश्वर दुध संस्था,श्रीयुत उमाजी पोवार (सर),विवेक पोतदार, युवराज पाटील (फौजी),  धनाजी पोवार, सुनील दादु पाटील, तेजस पाटील यांच्या सह वृक्षमित्र उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या