मोदी लाटेत निवडून येणाऱ्या खा. तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही निवडणुक लढवत आहात त्यामुळे विजय तुमचाच आहे

पोलीस प्रवाह न्यूज 

केंद्रातून भाजपची सत्ता घालवायची असेल तर नगरपंचायतपासून सुरुवात करा- रुपाली चाकणकर


रायगड: दि.२० - माणगांव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दि. १९ डिसेंबर रोजी माणगांव शहराच्या मध्यभागी महाड बँकेजवल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचार सभा पार पडली. पहिल्या टप्प्यात १३ जागांसाठी निवडणूक होत आहे. या प्रचारसभेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह राज्यमंत्री आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे यांनी माणगांवच्या जनतेला मार्गदर्शन केले. या प्रचार सभेला  मा. ता. रा. कॉ. अध्यक्ष सुभाष केकाणे, महिला अध्यक्षा संगीता बक्कम, मा. नगराध्यक्ष आनंद यादव, मा. नगराध्यक्ष योगिता चव्हाण,  महमूद धुंदवारे, पं. स. सदस्य शैलेश भोनकर, राजू शिर्के, रवींद्र मोरे, दिपक जाधव शेकाप नेते निलेश थोरे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापचे उमेदवार,  पदाधिकारी व कार्यकर्ते व माणगांवकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   या प्रचारसभेत महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, गेले तीन दिवस आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना होते. भाजप पक्ष हा सतत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा लावून निवडणुका लढवत असतो.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत यांनी एक वक्तव्य केलं की, शिवरायांनी हिंदू वॉटर बँक तयार केली आणि त्यावर वाजपेयी आणि मोदींनी कलश चढविला.  बंगळूरमधील भाजपचे मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे क्षुल्लक गोष्ट आहे. त्यांना एवढंच सांगायचं आहे की, बंगळूर हे छोटस शहर होत तिला महाराजांच्या वडिलांनी राजधानी घोषित केली. ज्या भाजप नेत्यांना ही क्षुल्लक गोष्ट वाटते त्यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्यायची आहे.  अच्छे दिनाचे वादे देऊन भाजपनी जनतेला फक्त महागाई दिली. केंद्रातील विषारी भाजप सरकारची पालमुळे ही तुमच्या घरापर्यंत येईपर्यंत वाट पाहू नका म्हणून त्याची सुरुवात नगरपंचायत पासून करा.  सगळी स्वप्न साकार करायची असतील तर शेवट पर्यत आपली माणस पाहिजेत. निवडणुकीसाठी जातीपातीचे राजकारण करायचे ही भाजपची संस्कृती आहे. ओबीसी आरक्षणाबाबत नक्की भाजपची भूमिका काय आहे. भाजपने ओबीसी आरक्षण बाबत न्यायालयाची दिशाभूल केली. त्यांना त्यांची जागा निवडणुकीच्या माध्यमातून दाखवायची आहे.  आपण सर्वच उमेदवार विजयी उमेदवार आहात कारण आपण ज्यांच्या पाठी बसलेले आहात ते खासदार म्हणजे प्रवाहाच्या पाण्याबरोबर लाकडाचे ओंडके देखील वाहतात पण प्रवाहाबरोबर वाहण्यासाठी काळीज हे सिंहाचा लागतं. मोदी लाटेत देखील निवडून येणारे खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही  निवडणूक लढवत आहात त्यामुळे तुमचा विजय हा पक्का आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यात आम्ही सातत्याने येतो. गेल्या वेळेस आलो तेव्हा वादळ व महापूराची पाहणी करण्यासाठी आलो होतो. पण प्रत्येक वेळेस रायगडमध्ये आलो की, मनाला एक समाधान वाटतं. समाधान यासाठी वाटतं की कोकणातला माणूस संकट काय असतात हे पाहतो आणि संकटासाठी दोन हात कसे करायचे हे त्याला चांगलं माहीत आहे. ते  आम्हाला जवळून पाहता येतं आणि नव्याने शिकता येतं.  पुराची परिस्थिती अतिशय भयानक व दयनीय होती.  अनिकेत तटकरे यांच्या समवेत पूरग्रस्त भागाची पाहणी केली. महिलांना भेटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर कनभर रोष, राग, निराशा जाणवली नाही. त्यांच्याशी संवाद साधला असता त्याने सांगितले की, निसर्गाचचा कसला राग धरायचा.  निसर्ग आमच्याकडून जेवढं नेतो त्याच्यापेक्षा कित्येक पट्टीने तो आम्हाला देतो. कोकणातील अथांग समुद्राप्रमाणेच कोकणातील लोकांचे विचार आहेत. आजचा दिवस माझा नसला तरी उद्याचा दिवस माझा आहे याची त्यांना खात्री आहे.  जे  संकट समोर आलय त्याला सामोरे जाण्याची ताकद कोकणवासीयांकडे आहे.  नेहमीच कोकणवासियांनी संकटाना तोंड देत धैर्य, सहनशीलता दाखवलेली आहे. महिला विभाग आयोगाचा  पदभार स्वीकारल्यानंतर आढावा घेत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, सर्वात कमी अत्याचार,बलात्कार सर्वाधिक कमी छेडछाडीचे प्रकार हे कोकण रायगड विभागाचे होते. याचे कारण म्हणजे कोकणात महिलांना योग्य तो मानसन्मान दिला जातो. त्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांचे आभार. त्यांनी आपला जिल्हा व्यवस्थित सांभाळला आहे.  इतर ठिकाणी सातत्याने सांगावे लागते की, महिलांना मान द्या सन्मान द्या.  खासदार तटकरे यांचे मी मनापासून आभार मानते की,  त्यांनी माणगाव नगरपंचायत निवडणुकीत ५०% पेक्षा जास्त जागा महिलांना दिल्या आहेत. लोकनेते शरद पवार यांच्या विकासाचा वारसा खासदार सुनील तटकरे,  राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे हे रायगड जिल्ह्यात तसेच कोकणात उत्तमपणे चालवीत आहेत.  राज्यमंत्री आदिती तटकरे दिवस-रात्र एक करून रायगड तसेच कोकणाच्या जनतेसाठी काम करताना आम्ही पाहिले.  आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्याला तळहाताच्या फोडासारखं जपलय आहे. सुखाच्या क्षणात येणारा माणूस कधीच लक्षात राहत नाही.  परंतु, दुखाच्या क्षणात येणात माणूस कायम लक्षात राहतो. त्यामुळे आदिती तटकरेना रायगड व कोकणाची जनता कधीच विसरणार नाही असं काम त्यांनी  विभागात त केलेल आहे. त्यामुळे विजय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निश्चित आहे याची खात्री मला वाटते. समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकास कामे करीत आहे. 

ज्या विश्वासाने आपण आशिर्वाद देत नगरपंचायतीचा कारभार चालविण्याची संधी दिली त्या विश्वासाची जाणीव ठेवत विकासकामांना गती देत आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न खा. सुनील तटकरे तसेच पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केला आहे हे प्रकर्षाने जाणवते. आगामी कालावधीत खा तटकरे तसेच राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या  नेतृत्वाखाली महसूल विषयक प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे न्यायालय स्थापन करणे.  अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी अद्यावत व सुसज प्रशासकिय इमारत व न्यायाधीश निवासस्थाने बांधकाम करणे. महामार्ग व रेल्वे अपघातामधील आपदग्रस्तांसाठी औषधोपचार करण्यासाठी अद्यावत व सुसज्ज ट्रॉमा केअर सेंटर स्थापन करणे.  नगरपंचायतीसाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधणे. नाटयगृह बांधणे.  काळ नदी संवर्धन प्रकल्पाद्वारे बाग - बगीचा विकसित करणे व सौंदर्याकरण करणे.  परिवहन विभागामार्फत वाहनचालकांकरीता अद्ययावत प्रशिक्षणासाठी ब्रेक टेस्ट ट्रॅक यंत्रणा स्थापन करणे. आधुनिक अग्निशमन दलासाठी स्वतंत्र इमारत बांधणे यासारखी विधायक लोकोपयोगी व समाजाधिमुख या प्रकारचे कामे तटकरे कुटुंबियांनी हाती घेतली असून शासनास्तरावर मान्यतेसाठी कार्यवाही सुरू झालेली आहे. या अशा विकासकामांसाठी आपल्या विचाराच्या लोकांना निवडून देण गरजेचे आहे. माणगाव नगरपंचायतच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शेकापच्या उमेदवारांना भरघोस मताधिक्क्याने निवडून द्यावे असे आवाहन राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.    

खा. सुनील तटकरे मार्गदर्शन करताना म्हणाले की, माणगांव नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता येईल. ५  वर्षा पुर्वी विकासाच्या मुद्यावर राष्ट्रवादीनी निवडणूक लढवली आणि त्यात राष्ट्रवादीला भरघोस यश आले. राज्यात महाविकास आघाडी असताना फक्त माणगांवातच बिघाडी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजप खालच्या थराला जाऊन आरोप प्रत्यारोप करीत आहे. त्याच भाजपच्या लोकांना सोबत घेऊन माणगांवमध्ये शिवसेनेने आघाडी केलेली आहे. हे शिवसैनिक बाळासाहेबांचे शिवसैनिक नाहीत. छोट्याच्या सत्तेसाठी त्यांनी स्वतःचा स्वाभिमान  विकला आहे.    शिवसेनेने कमळाचा देठ कधी कापला हे भाजपला समजलेच नाही.  भाजप सारखा राष्ट्रीय पक्ष माणगांव नगरपंचायत निवणुकीत कमळ निशाणी न घेता लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामाणिकपणे माणगांव नगरपंचायत निवडणुकीला सामोरे जात आहे. परंतु, विरोधक अगदी खालच्या थराला जाऊन राजकारण करीत आरोप प्रत्यारोप करीत आहेत.

माणगांव नगरीत आनंद यादव हे राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा आहेत. शिवसेनेकडे कोणता चेहरा आहे हे त्यांनी सांगावे.   माणगांव नगरपंचातीमधील  गेली पाच वर्षे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच पहिलं पाऊल होत. येणारी वर्ष की माणगांवची कायापालट करणारी वर्ष असतील. कधी टेंडर निघतो आणि आम्ही कधी भरतो अशी प्रवृत्ती मी आता ठेचून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.  १९ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ व शेकाप १ असे मिळून १७-० असा निकाल लागेल यांची मला खात्री आहे.  

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे या शहरात असलेल्या घरापर्यंत जाणारा रस्ता आणि नळ पाणी जोडणी ही सुद्धा राष्ट्रवादी पक्षानेच केलेली आहे. गेल्या २० वर्षात माणगांव शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे माणगांव शहराचा पायाभूत विकास करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयन्त केलेला आहे. आमच्याकडे मतदार राज्याला सांगायला कामे आहेत विरोधकांकडे काहीच नाही. १०५ नगरपंचायत पैकी जर कुठे नाट्यगृह मंजूर झाले असेल तर ते प्रथम माणगांव शहरात झाले आहे. आम्हाला वाटत होतं जस महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सरकार आहे तस माणगांवात असावं. त्यासाठी बैठक सुद्धा घेतली पण शिवसेनेने त्यात खो घातला. आज माणगांव शहरात खूप अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. शहरात उभ्या असलेल्या महाविद्यालयाची जागा ही सुनील तटकरेमुळेच सरकारने दिलेली आहे याची थोडी तरी आठवण ठेवा. माणगांवच्या गावात ७० ते ७५ कोटींच क्रीडा संकुल उभं राहणार आहे याचा मला अभिमान आहे. त्यासाठी मी राज्यमंत्री आदिती तटकरे हिचे आभार मानतो. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या