बैलगाडी शर्यत - शिरोळमध्ये जल्लोष
*मा. कै प्रसाद गणपतराव धर्माधिकारी यांच्या लढ्याला यश*
बैलगाडी शर्यतीवर बंदी घातल्यानंतर कै प्रसाद गणपतराव धर्माधिकारी यांनी लढा उभारला होता. सरकारने बंदी उठवावी या मागणीसाठी अखिल भारतीय शेतकरी शर्यत बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने शिरोळचे ग्रामपंचायत सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सांगली येथे बैलगाडी, चालक, मालक यांच्यासह मोर्चा काढण्यात आला होता. *केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे बेंगलोर महामार्गावर बैलगाडीसह रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते.* शिरोळ येथील ग्रामसभेत ठराव करून बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्यात आले होते.
जुन 2018 मध्ये Abp majha या न्युज चॅनेल वर झालेल्या Live चर्चासत्रात प्रसाद धर्माधिकारी यांनी बैलगाडी शर्यतीचे जोरदार समर्थन केले होते.
आजचा बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्याचा निर्णय म्हणजे प्रसाद धर्माधिकारी यांच्या लढ्याचे यश आहे.

0 टिप्पण्या