कागल - पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांची रणदेवीवाडी सुरक्षा दल संदर्भात माहिती व गाव भेट

 

पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांची रणदेवीवाडी सुरक्षा दल संदर्भात माहिती व गाव भेट.

गावामध्ये युवकांनी फ्रॉड कॉल ना बळी पडू नये, लहान वयातील प्रेम प्रकरणे, अनुचित प्रकार,भांडण-तंटा, यावरील उपाय योजना या संदर्भात माहिती देण्यात आली.तसेच गावामध्ये शांतता व सुव्यवस्था राखावी असे आवाहन केले.


  कागल पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक गोर्ले  यांचे ग्रामपंचायत रणदेवीवाडी च्या वतीने  ग्रामपंचायत सदस्य प्रदिप खोत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच गावातील उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन आणि माहिती देण्यात आली.

यावेळी उपस्थित ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच शोभा खोत, ग्रामपंचायत सदस्य प्रदिप खोत,  माजी उपसरपंच सुधाकर खोत, तानाजी खोत,पांडूरंग सुतार,रवींद्र खोत,यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या