नियमाचे पालन हीच सुरक्षितता:- पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे ;कोल्हापूर सराफ व्यापारी संघाला भेट

 

कोल्हापूर : नियमांचे पालन हीच महत्त्वाची सुरक्षितता असल्याचे मत जुना राजवाड्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी व्यक्त केले. कोपरा सभा  अंतर्गत नाळे यांनी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

नाळे म्हणाले, गुन्हेगारीचे अलीकडे प्रमाण वाढले आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी संघाबरोबर प्रत्येक व्यावसायिकाने सीसीटीव्ही बसवून सुरक्षा घ्यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून व्यवसाय करावा.

यावेळी सराफ संघाच्या पदाधिकारी, संचालक आणि व्यावसायिकांनी दुकानात होणारी चोरी व अडचणी मांडल्या. अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष जितेंद्र राठोड यांनी आभार मानले. सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), संचालक शिवाजी पाटील, प्रीतम ओसवाल, सुहास जाधव, प्रसाद कालेकर, टंच समिती सदस्य राजू बारस्कर, कोल्हापूर बंगाली कारागीर संघाचे अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक, उपाध्यक्ष इंद्रजित सामंत, सोने टेस्टिंग मशीन संघटनेचे कार्याध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सरदार सासने, नचिकेत भुरके यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या