फोटो / ओळ
साके : येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य शिबीर उद्घाटन प्रसंगी सरपंच सुशीला पवार,बाळासाहेब तुरंबे,युवराज पाटील,उपसरपंच निलेश निऊंगरे आदी.
पोलीस प्रवाह न्युज
कोल्हापुर प्रतिनिधी ; विनायक सातुसे
बातमी संपर्क ; 9766498212
साके ता.कागल येथील ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोग निधीतून विविध उपक्रम राबविले जात असुन त्यामध्ये ग्रामपंचायत साके व ज्ञानदीप बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बसरेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते.त्याला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला.
आरोग्य शिबिरात हृदय विकार,मुतखडा, नेत्र तपासणी,हाडांचे विकार,स्त्री वंध्यत्व तपासणी इत्यादी आजारावर तज्ञ व अनुभवी डॉक्टरांच्या कडून उपचार व मार्गदर्शन केले गेले,गुडघेदुखी,सांधे दुखी,ताप,त्याचबरोबर ई.सी.जी ची निशुल्क तपासणी केली गेली.तर धनुर्वात चे इंजेक्शन मोफत दिले गेले.ह्या आरोग्य शिबिरास २६२ ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला.
तर ह्यावेळी माजी पं.समिती सदस्य बाळासाहेब तुरंबे,सरपंच सुशीला पोवार,मारुती निऊंगरे,मोहन गिरी,उपसरपंच निलेश निऊंगरे,ग्रा.प सदस्य युवराज पाटील,आक्काताई चौगले,संपदा पाटील,विश्वास जाधव,ग्रामसेवक संजय पाटील,कर्मचारी मारुती पाटील इ. ग्रामस्थ उपस्थित होते.तर संस्थेच्या वतीने डॉ.ए.आर.कणबरकर,डॉ.रवि पोतदार आणि सर्व आरोग्य सेवक स्टाफ उपस्थित होता.

0 टिप्पण्या