उस्मानाबाद- प्रतिनिधी
*उस्मानाबाद पोलीस लाईन येथील रहिवासी असलेले पोलीस बॉईज श्री. इम्तियाज पाशाभाई शेख यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी आज दिनांक 28 / 11 / 2021 रोजी येथील शासकीय विश्रागृहावर झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली आहे. इम्तियाज शेख यांचा उस्मानाबाद मधे मोठा मित्रपरिवार असून शहरातील विविध पक्षातील राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असून अनेक सामाजिक कार्यामध्ये ते सतत अग्रेसर असतात. उस्मानाबाद पोलीस लाईन मध्ये रहिवासी असलेल्या पोलीस कुटुंबियांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असतो.
त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी इम्तियाज शेख यांची उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले असून उस्मानाबाद येथील, प्रवीण जाधव , अभिजित देडे , शुभम कदम , सुरेश सातपुते , रजुभाऊ सुपेकर , नौशाद शेख , अजय ठाकूर , अक्षय वाघचौरे , नाना मुंगळे , बाळू गायकवाड , इम्रान शेख , सचिन झोंबाडे , विलास साकळे , प्रो. निशांत निरमळे सर, प्रशांत पोतदार ,अशोक सोमवंशी , कुणाल वाघमारे , उमेश राठोड , राहुल माने , मोहसीन काझी , अब्रार शेख , अन्वर शेख , प्रदीप बानुर , अदनान शेख , मोईन अली , सुशांत जाधव , दीपक गायकवाड , रिझवान शेख आदींनी इम्तियाज शेख यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या*

0 टिप्पण्या